गूळ खाण्याचे फायदे – Jaggery benefits & information in Marathi.
उसाच्या रसातील पाणी आटवून गुळाची निर्मिती केली जाते. उसामधील सर्व खनिज द्रव्य व क्षार गुळा मध्ये उतरतात. बाजरीची भाकरी व गूळ हा थंडीच्या मोसमातील पौष्टिक आहार आहे. गुळ हे श्रमिकांचे, कष्टकऱ्यांचे टॉनिक मानले जाते. थकून-भागून आलेल्या माणसांचा थकवा गूळ पाणी दिल्यावर पळून जातो व तरतरी येते. गुळ हा उष्ण गुणधर्म राखणारा असला तरी जसा जसा जुना होत जाईल तसा तसा अधिक शीतल होत जातो. जुना गूळ पचण्यास हलका असून पांडुरोग, प्रमेह, पित्तप्रकोप, त्रिदोष, फिक्कटपणा दूर करतो. साखरेपेक्षा ही गुळामध्ये पोषक घटक व औषधी गुणधर्म जास्त प्रमाणात असतात.

Also Read – Milk dairy products information in Marathi – Benefits, Uses & demerits.
गूळ खाण्याचे फायदे
A– गुळ वीर्यवर्धक, वायुनाशक, जड व स्निग्ध आहे नवा गूळ कफ,श्वास, खोकला व कृमी व अग्निवर्धक आहे.
B– जुना गूळ हलका,सुस्ती दूर करणारा पित्तनाशक, अग्नि प्रदीपक,मधुर,वायुनाशक व रक्तशुद्धी कारक असतो.
C– धूर डोळ्यात गेल्याने डोळे जळतात अशावेळेस डोळ्यात गुळाचे पाणी घालावे जळजळ कमी होते.
D– पायात काटा किंवा काच गेल्यास गूळ गरम करून त्या ठिकाणी बांधल्यास काटा किंवा काच बाहेर निघते.
E– गुळ आल्यासोबत खाल्ल्याने कफ दूर होतो.हिरड्या सोबत घेतल्याने पित्त नाहीस होते. सुंठे बरोबर थोडे तूप घालून घेतल्याने वायूचा नाश होतो.
F– गोमेचा दंश झाल्यास दंश स्थानी गुळ जाळून लावल्याने सूज बरी होते.
काही महत्वाचे
पित्त प्रकृती असणाऱ्यांनी नवा गुळ खाऊ नये. तसेच कृमी, नेत्ररोग,ताप,मंदाग्नी,सर्दी,मधुमेह, त्वचारोग, दाताचे विकार असणाऱ्यांनी नवा गुळ खाऊ नये.
You may like – 13 Wheat benefits in Marathi – गहू खाण्याचे फायदे
tags – Gul khanyache fayde, Gulachi mahiti, Gul nutrients
2 thoughts on “गूळ खाण्याचे फायदे – Jaggery benefits & information in Marathi.”