November 28, 2023

चिरलेली भाजी कशी साठवावी – How to store cut vegetables?

जेवण करण्यासाठी जेवढा वेळ लागत नाही.तेवढा वेळ जेवणाच्या तयारी करता लागतो. अर्थात भाजी बनवायची तरी ती धुवा,चिरा, त्यासाठी लागणारे साहित्य, या सगळ्याची तयारी करण्यात बराच वेळ जातो. अशा वेळी जेवण बनवणे सोपे जावे, शिवाय वेळही वाचावा.म्हणून आपण दुसऱ्या दिवशीच्या जेवणाची आदल्या दिवशीच तयारी करून ठेवतो. म्हणजे भाज्या व इतर साहित्य कापून फ्रीजमध्ये ठेवून देतो. परंतु असे केल्याने भाज्यांमधील पोषकतत्वे नष्ट होऊ शकतात.तेच आपण चिरलेली भाजी योग्य पद्धतीने साठवून ठेवली तर,त्यातील पोषकतत्वे नष्ट होणार नाहीत आणि आपला वेळही वाचेल . Chala janun ghevu Chirleli bhaji kashi sathvavi.

चिरलेली भाजी कशी साठवावी - How to store cut vegetables?
चिरलेली भाजी कशी साठवावी – How to store cut vegetables?

चिरलेली भाजी कशी साठवावी – How to store cut vegetables?

1)हिरव्या पालेभाज्या – How to store cut green vegetables?

पालक, मेथी, कोथिंबीर आदी पालेभाज्या लवकर खराब होतात.या भाज्या कापून फ्रीजमध्ये ठेवताना खालील गोष्टी लक्षात ठेवा.

  • पान चांगली साफ करून मग चिरा, देट ठेवू नका. फक्त पानच घेऊन चिरून ठेवा.
  • सुकलेली खराब झालेली पानं ताज्या पानां सोबत ठेवू नका नाहीतर सर्व भाजी खराब होईल.
  • पालेभाज्या नेहमी कागदी पेपरमध्ये गुंडाळून ठेवाव्यात. त्यामुळे त्यातील ओलावा टिकून राहतो. पेपर नसल्यास पातळ सुती कपड्यामध्ये गुंडाळून ठेवा.
  • दोन दिवसांच्या वर या भाज्या फ्रिज मध्ये ठेवू नका.

2) फरसबी – How to cut & store green beans?

ही भाजी पटकन बनते पण तिला चिरायला वेळ लागतो. म्हणून ती आधीच चिरून फ्रीजमध्ये ठेवून द्या. फरसबी धुऊन, चिरून त्यातील पाणी सुकल्यानंतर एका प्लास्टिक बॅगमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवा.

3)कोबी आणि ब्रोकोली – How to store cut Cabbage & Broccoli?

कोबी आणि ब्रोकोली चिरून थोड्या ओलसर पेपर मध्ये वा टावेल मध्ये गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवा. यामुळे यातील ओलावा आणि पोषक तत्वे ही कायम राहतील.

4)भोपळा – Tips to store cut Pumpkin?

भोपळा व्यवस्थित धुऊन चिरा. त्यानंतर हवाबंद डब्यात मध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवा.

You may like – फायबर युक्त पदार्थ मराठी माहिती – fiber in food information in Marathi.

5) मटार – How to preserve cut Pea?

नाश्त्यामध्ये मटार च्या वेगवेगळ्या डिशेस खायला सगळ्यांना आवडतात. परंतु हे मटर सोलण्यात बराच वेळ जातो. म्हणून मोकळ्या वेळेत मटार सोलुन, एका प्लास्टिकच्या पिशवीत किंवा हवाबंद डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवा.

6) जमिनीखाली वाढणाऱ्या भाज्या – How top preserve Root and tuber crops?

बटाटा गाजर मुळा बीट इत्यादी भाज्या चिरून एका बाउल मध्ये पाणी घेऊन त्यात घाला नंतर हे पाऊल एखाद्या कापडाने किंवा फ्लॅट ने झाकून फ्रीजमध्ये ठेवा.

7) कांदा आणि लसूण – How to preserve cut Onion & Garlic?

रस भाजी बनवण्याकरता कांदा लसूण पेस्ट आवश्यक असते. आयत्या वेळी डोळ्यात पाणी आणणारा कांदा चिरायचा.शिवाय लसूण सोलायची,हे वेळखाऊ काम आहे. तेव्हा आधीच हे कापून फ्रिजमध्ये ठेवता येते. कांदा आणि लसूण सोलून, चिरून हवाबंद डब्यात घालून फ्रिजमध्ये ठेवा. परंतु चिरलेला कांदा 24 तासांपेक्षा जास्त वेळ साठवू नये. तसेच लसूनही दोन दिवसात वापरून टाकावा.

8) सिमला मिरची ( ढोबळी मिरची ) – Bell pepper cut & restore techniques.

लाल,हिरवी,पिवळी अशा वेगवेगळ्या रंगाच्या सिमला मिरच्या कापून. प्लास्टिकच्या पिशवीत किंवा हवाबंद डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवा. चुकूनही ओल्या कपड्यात बांधून ठेवू नका.

9) भेंडी – How to preserve cut ladyfinger/Ochro?

भेंडीची भाजी करण्यात बराच वेळ जातो.मुलांना डब्यात हि भाजी द्यायची असल्यास सकाळी घाई होते. म्हणून ही भाजी रात्री चांगली धुऊन, पाणी सुकवून,कापून नेट बॅग मध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवा.

Don’t cut and keep below vegetables in Freeze – ह्या भाज्या कधीचीच चिरून फ्रीझ मध्ये ठेवू नका.

1- टोमॅटो आणि वांग कधीही आधीपासून चिरून फ्रीजमध्ये ठेवू नका.ते खाण्यालायक राहत नाहीत.असे केल्यास त्यातील ओलावा सुकून जातो. म्हणून या भाज्या आयत्यावेळी चिराव्या.

2- नेहमी मसालेदार भाजी बनवण्या ऐवजी आधी मधी कमी मसालेदार भाजी बनवा. मुलांच्या आरोग्याचा विचार करून रंगीत मिक्स भाजी ही बनवता येते.मिक्स भाज्या उकळवून त्यात हलकासा चाट मसाला आणि मीठ घालून स्वादिष्ट बनवता येते. त्यामुळे भाज्या तील सर्व पोषक तत्वे मिळतील आणि मुलं आवडीने ही या भाज्या खातील.

एक छानशी मिश्र भाजी – Mix vegetable Recipe.

साहित्य – दोन कप मटार दाणे, पाच बटाटे, दोन कांदे, एक लहानसं फ्लावर,एक टेबल स्पून भाजकी उडीद डाळ, अर्धी वाटी ओले खोबरे,तिखट, कढीपत्ता, हळद चवीनुसार साखर,मीठ,तेल,दोन चमचे धने, जिरे थोडा चिंचेचा कोळ.

कृती — कांदा व फ्लॉवर बारीक चिरा. बटाट्यांच्या साल काढून पातळ फोडी करून घ्या.उडीद डाळ, धने, ओले खोबरे,तिखट,मीठ, हळद हे साहित्य एकत्र वाटून ठेवा. थोडे मोठे मीठ घातलेल्या पाण्यात बटाटा,फ्लावर, मटार वाफवून घेणे,जिरे, कढीपत्ता घालून तेलाची फोडणी करा. त्यावर कांदा परता, त्यावर मसाला वाटण परता, नंतर वाफवलेल्या भाज्या घालून,साखर किंवा गूळ,चिंच कोळ घालून परता. चांगले परतल्यावर खाली उतरा. अशी तयार झाली आपली मिश्र भाजी.

Also read – 10 superfoods to improve immunity of children in Marathi.

Comments are most welcome and appreciated.