नाचणीचे पराठे

पिठ बनविण्याचे साहित्य

एक कप नाचणीचे पीठ, थोडेसे तूप, चवीनुसार मीठ.

स्टफिंग साठी लागणारे साहित्य

पनीर, डाळींबाचे दाणे, चिरलेली कोथिंबीर.

कृती

सर्वप्रथम नाचणीच्या पिठात मीठ, तूप व पाणी घालून चांगले मळून घ्या. त्यानंतर पनीर मॅश करून. त्यात स्टफिंग साठी घेतलेले सर्व साहित्य चांगल्याप्रकारे व्यवस्थित मिसळा. मग हे स्टफ पिठाच्या गोळ्यात पूरना सारखे भरून त्याची छानशी पोळी लाटावी. व तव्यावर खरपूस असे भाजून घ्यावे. व दह्यासोबत सर्व करावे.

Comments are most welcome and appreciated.

%d bloggers like this: