मध
सुगंधी, रुचकर, चविष्ट असा मध मधमाशा द्वारे प्राप्त होतो. मध साखरेपेक्षा ही गुणकारी असल्याने जेथे शक्य होईल तेथे साखरेऐवजी मधाचा वापर करणे फायद्याचे असते. औषध निर्मितीसाठी मध फारच उपयोगी पडतो. मध गरम करू नये, गरम पदार्थात घालू नये,तसेच मधाचे सेवन केल्यावर गरम पाणी पिऊ नये मध थंड, हलका,गोड, डोळ्यास हितकारक, अग्नी प्रदीप्क,रुक्ष मलावरोध दूर करणारा,स्वर सुधारणारा, रुचकर, वर्ण सुधारणारा,मृदुता उत्पन्न करणारा असून कृमी, मेद, तहान,खोकला,कोड,पित्तदोष,, रक्तदोष तसेच रक्तपित्त दूर करणारा.श्वास, उचकी, दाह, क्षय, अतिसार, श्वास यामध्ये अतिशयच गुणकारी ठरणारा आहे.

You may like – गूळ खाण्याचे फायदे – Jaggery benefits & information in Marathi.
मध खाण्याचे फायदे – benefits of eating honey in Marathi.
A– अस्सल मध कसा ओळखावा अस्सल मधाचा थेंब पाण्यात टाकल्यास तळाशी जाऊन बसतो. अस्सल मध किंवा अस्सल मध चोळलेले पदार्थ कुत्रा खात नाही. अस्सल मधात कापसाची वात बुडवून पेटवल्यास आवाज न करता पेटत राहते.
B– विंचूदंशावर दंशस्थानी मध चोळल्याने दाह कमी होतो.
C– भाजलेल्या जखमेवर मधात पातळ फडके भिजवून दुखऱ्या जागेवर ठेवावा.
D– उचकी लागल्यास मोरपीस जाळून त्याची राख मधात खलून चाटावी.
E– टॉन्सिल चा त्रास झाला असता मध व पाण्याच्या गुळण्या कराव्यात.
F— शक्ती वाढवण्यासाठी चमचाभर मध कपभर दुधात घालून प्याव.
G– सर्दी झाल्यास मध आणि आल्याचा रस एक चमचा घेऊन एकत्र करून सकाळ-संध्याकाळ घ्यावा.
H– कफविकारा मध्ये अर्धा चमचा मध दिवसातून चार-पाच वेळा चाटवावा.
I– मलावरोध झाल्यास रोज सकाळी चमचाभर मध कोमट पाण्यातून व चमचाभर मध रात्री दुधातून द्यावा.
J– काना मधून पु येत असेल कान दुखत असेल तर मध कानात घालावा.
K— रोज सकाळी चमचाभर मध थंड पाण्यातून घेतल्याने त्वचारोग बरा होतो.त्यासाठी कालावधी चार ते पाच महिने लागतो.
L— उलटी होत असल्यास गूळ व मध एकत्र घ्यावा.
M– प्रत्येकी एक चमचा मध व अडुळशाचा रस, अर्धा चमचा आल्याचा रस एकत्र करून घेतल्याने खोकल्या मध्ये आराम पडतो.
N– रक्त पित्त झाले असल्यास बकरीचे दूध, मध व साखर एकत्र करून प्यावे.
O— रक्तदाबाचा विकार असणाऱ्यांनी दोन चमचे मध व चमचाभर लिंबाचा रस एकत्र करून सकाळ-संध्याकाळ घ्यावा.
P– कानामध्ये गोमाशी गेल्यास मध कानात घालावा. कानात घोन गेल्यास, मध खोबरेल तेल एकत्र करून कानात घालावे.
Q– स्थूलपणा कमी करण्यासाठी रोज सकाळी अनशापोटी दोन चमचे मध ग्लासभर कोमट पाण्यात मिसळून प्यावा.
Also Read – Milk dairy products information in Marathi – Benefits, Uses & demerits.
काही महत्वाचे
तूप व मध एकत्र समप्रमाणात सेवन करू नये. ताप चढत असताना मध घेऊ नये.मध सेवणाने होणाऱ्या दुष्परिणामांची तीव्रता कमी करण्यासाठी कच्चे धने व डाळिंब खावे.
Also Read – साखर आणि खडीसाखर खाण्याचे फायदे – Sugar eating benefits in Marathi.
tags – Madh khanyache fayde, Madh benefits, Madh ka khava, Madhache upyog, honey benefits marathi.
One thought on “मध खाण्याचे फायदे – benefits of eating honey in Marathi.”