साखर आणि खडीसाखर खाण्याचे फायदे – Sugar eating benefits in Marathi.
उसाच्या रसापासून साखरेची निर्मिती होते. गुणधर्मामध्ये मात्र गूळ हा साखरेपेक्षा उजवा ठरतो. गुळाची निर्मिती उसापासून होत असल्याने उसातील क्षार व खनिज द्रव्य त्यात भरपूर उतरतात. साखरेची निर्मिती करताना ऊस व बीट यांच्या रसात थोडा चुना मिसळून तो रस उकळला जातो. चुन्या मुळे रसातील मळ दूर होतो. त्यातील पाणी आटल्यावर वनस्पती कोळशाच्या सहाय्याने पांढरीशुभ्र दाणेदार साखर बनवली जाते. या प्रक्रियेमध्ये साखरे मधील नैसर्गिक पोषक द्रव्यांचा ऱ्हास होतो व राहते ते नुसते कार्बोहायड्रेटचे रासायनिक संयुगं. साखरेचा फायदा शरीराला इंधन पुरवठा करणारा घटक एवढाच होतो.

Also Read – गूळ खाण्याचे फायदे – Jaggery benefits & information in Marathi.
A– साखर गोड, थंड, वायू,पित्तनाशक, स्निग्ध, पौष्टिक, वीर्यवर्धक, बलकारक असून उलटी येणे थांबते.
B– रक्तातील कमी झालेल्या शर्करेचे प्रमाण वाढविण्यासाठी शरीराला साखरेचा उपयोग होतो.
C– साखर पाण्यात विरघळून प्यायल्याने जुलाब व्हायचे थांबतात.
D– साखर व गूळ जाळल्यास होणाऱ्या धुरामुळे हवा शुद्ध व जंतुरहित होते.
E– पाण्यात साखर घालून प्यायल्यास तृषा रोग दूर होतो.
F– पाच चमचे खडीसाखर व पंधरा चमचे धने चांगले कुटावेत व ते चूर्ण पाण्यात उकळून तासभर झाकून नंतर गाळून बाटलीत भरून ठेवावे. या पाण्याचे थेंब सकाळ-संध्याकाळ डोळ्यात घातल्याने डोळे दुखणे बंद होते.
G– तोंड आल्यास खडीसाखर व कंकोळ तोंडात धरावे.
H– खडीसाखर व केशर गायीच्या तुपात खलून त्याचे नस्य केल्यास अर्धशिशी या विकारांमध्ये फायदा होतो.
I– खोकला आल्यास खडीसाखर व आल्याचा तुकडा तोंडात धरावा.
J– खडीसाखर व काळा बेदाना बारीक कुटून थोडा खाल्ल्यास भोवळ येणे व चक्कर येणे थांबते.
काही महत्वाचे
आहारात साखरेचे प्रमाण वाढल्याने जठर व आतड्यातील आमल वाढते.जठरात अधिक साखर घेतल्याने जठराच्या अंतर त्वचेचे दहा होतो. साखरेमुळे लहान मुलांचे दात किडतात, मधुमेहाचा विकार असणाऱ्यांना गुळ व साखर दोन्ही निरुपयोगी असतात सांधेदुखी मध्ये साखरेचे अतिसेवन टाळावे.
also read – ज्वारी खाण्याचे फायदे व पदार्थ in Marathi Jwari che fayde ani padarth.
tags – sakhar khanyache fayde, khadisakhar khanyache fayde, sakharechi mahiti