Table of Contents
Bhaja Caves History & Information in Marathi.
hello Everyone we travelled to Bhaja caves this weekend so here i am sharing my experience of visit and also covering details like Bhaja caves history, Information, Entry fees and timings.
Bhaja Caves Travel Vlog Youtube Video.

Also Read : Bhandara Hill information
नमस्कार मित्रानो तर आम्ही तळेगाव दाभाडे मध्ये राहत असल्याने लोणावळ्याच्या आजूबाजूला फिरणं तर चालूच असता तर आम्ही ह्यावेळी भाजा लेणी पाहायला गेलो होतो. तर चला पाहूया भाजा लेणीची माहिती आणि इतिहास.
तर भाजा लेणी पुण्यापासून ६० KM अंतरावर आहे . लोणावळा जवळील मळवली गवानजीकचा भाजे गावामध्ये हि प्राचीन बौद्ध लेणी आहेत. येथील चैत्यगृह हे खूप सुंदर आहे , आजूबाजूला भिक्षूंना राहण्यासाठी खोल्याही पाहायला मिळतात.

Bhaja Caves Entry fees?
भाजे लेणी पुरातत्व विभागामध्ये आल्याने एका व्यक्तीस २५ रुपये एवढी प्रवेश फी आहे & जर तुम्हाला कॅमेरा वापरून विडिओ काढायचा असेल तर त्यासाठी ५० रुपये भरून परमिशन काढावी लागते.
Bhaja Caves History in Marathi.
तर भाजे लेणी इसवी सण दुसऱ्या शतकात करण्यास सुरुवात झाली त्यानंतर ६ व्या शतकापर्यंत त्याचा कोरण्याचा काम चालू होता म्हणजे भाजे लेणी कोरण्यास ८०० वर्ष लागली. जनतेचा दानमधून येथील विहार बनवले गेले आहेत. त्याचे लेखही ब्राम्ही लिपीमध्ये कोरलेले दिसून येतात.

Bhaja Caves information.
भारताचा संगीत कलेमध्ये भाजे लेणीच खूप महत्व आहे ते तेथे कोरलेल्या प्रतिकृती मध्ये दिसून येते . तेथे एक तबला वाजवणारी आणि एक नाचणारी नर्तकी दिसून येते. येथे गवाक्षांचा माळा आहेत आणि त्याला लागूनच कोरीव सज्जे पाहायला भेटतात . सज्जांवर जाळी आणि पडद्यासारखे कोरीव काम केले आहे. वेदिकापट्टीवर नक्षीदार कोरीव कामसुद्धा दिसून येत. येथे एक यक्षिणी कोरलेली आहे तिने पकडलेला झाड व यक्षिणी अजूनही स्पष्ट दिसून येतात.
येथील चैत्याची उंची हि १७ मीटर इतकी आहे आणि रुंदी ८ मीटर आहे. तिथे २७ अष्टकोनी खांब आहेत व त्यावर कमळ, चक्र अशी चिन्हेही कोरलेली आहेत . एका खांबावर खुंटी आणि त्यावर अडकवलेला हार दिसतो.चैत्यगृहामध्ये मधोमध स्तूप आहे. चैत्यगृह ला लाकडी तुळ्यांचे चाट आहे त्यावर ब्राम्ही लिपीमधील लेखही आहेत.


भाजा caves सूर्य लेणी.
भाजे लेणींचा समुहामधील सूर्य लेणी अन खूप सुंदर आहेत. यामध्ये पौराणिक गोष्टींचे पट. शास्त्र घेऊन उभा द्वारपाल. वन्यप्राणी आणि चैत्यस्तूपांचे नक्षीकाम पाहायला भेटते . यामध्ये इंद्र आणि ४ घोड्यांवर बसलेला सूर्य असा देखावाही पाहायला भेटतो. रथामध्ये सूर्यासोबत दोन स्त्रीया दिसतात त्या त्याचा राण्या छाया व संध्या आहेत असा मानणं आहे . एक चामर ढाळताना आणि एक छत्र पकडताना पाहू शकता. रथाखाली काही असुर तुडवलेला दृश्य दिसून येते

तुम्हाला इथे भगवान महादेवाची पिंडही पाहायला मिळते .

Bhaja Caves information in Hindi, English & Marathi.



tags – Budhisht caves in pune, cavesin lonavla, pune travel places, historical places in pune, bhaja caves history information and photos.
4 thoughts on “Bhaja Caves information & History in Marathi – भाजा लेणी”