November 28, 2023

Hing / Asafoetida information in Marathi – हिंग याबद्दल माहिती व उपयोग

Hing / Asafoetida information in Marathi – हिंग याबद्दल माहिती व उपयोग

जेवणामध्ये हिंग घाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. फोडणी देण्यासाठी हिंगाची आवश्यकता भासते. जेवणाची रुची वाढवणे हे हिंगाचे मुख्य काम आहे. दक्षिण भारतामध्ये सांबार या लोकप्रिय प्रकारांमध्ये हिंगाचा वापर करून त्याची लज्जत वाढवली जाते.परंतु हिंगाचा वापर फक्त जेवणामध्ये रुची निर्माण करणे इतकाच होत नसून औषध निर्मिती करता ही करता येतो.याचा वापर केवळ पदार्थाला चव प्राप्त करून देणे तसेच फोडणी साठी उपयोगी पडणे एवढ्याच करता नसून औषध रूपाने शरीरामध्ये होणाऱ्या बिघाडपासून संरक्षण ही देण्याकरता आहे.

Hing / Asafoetida information in Marathi - हिंग याबद्दल माहिती व उपयोग
Hing / Asafoetida information in Marathi – हिंग याबद्दल माहिती व उपयोग

हिंग खाण्याचे फायदे.

Benefits & Uses of Hing in Marathi – Asafoetida benefits in Marathi.

 • A– हिंग गॅसनाशक आहे, वेदनाशामक आहे, पाचक आहे आणि कृमिनाशक हि आहे. हिंगाचा औषधासाठी चा उपयोग चरकसंहिता, निघण्टु, रत्नाकर आधी आयुर्वेदामधील ग्रंथांमध्येही लिहिला गेला आहे.
 • B– प्रामुख्याने हिंगाचा अंतर्भाव असलेले हिंगाष्टक चूर्ण अजीर्णावर मात करण्यासाठी वापरले जाते. हे चूर्ण पाव चमचा तुपा मधून द्यावे अजीर्णावर गुणकारी ठरते.
 • C– पोटात वायू धरल्यास त्याचा आतड्यांवर दाब पडतो. बेचैन व्हायला लागते.माणूस पोटदुखीने हैराण होतो. अशा वेळेस सुंठ आणि काळी मिरी यांचे हिंगा बरोबर समप्रमाणात चूर्ण करून घ्यावे. दिवसातून आवश्यकतेनुसार दोन-तीनदा पाव चमचा चूर्ण घ्यावे हा प्रयोग बरे वाटेपर्यंत च करावा.
 • D— शरीरामध्ये वायूचे प्राबल्य जास्त झाल की तो इतरत्र आपले हातपाय पसरायला सुरुवात करतो. कधीकधी त्यायोगे छाती मधून कळा येऊ लागतात. अशा वेळेस सैंधव दालचिनी ओवा आणि हिंग यांचे समप्रमाणात वस्त्रगाळ चूर्ण घ्यावे आणि सकाळी व रात्री मधा मधून हे चाटण घेतल्याने पंधरा वीस दिवसात बरे वाटू लागते.
 • E– हिंग कृमिघन आहे. पोटातील रोगजंतूंचा ते प्रभावीपणे नाश करते. चिघळलेल्या जखमान्वर ही हिंगाचा उपयोग होऊ शकतो.जखमेला कीड लागून दुर्गंधी येऊ लागली तर जखम सर्वप्रथम स्वच्छ करावी आणि त्यातून हिंगपूड भरावी किडे मरतात व जखम लवकर बरी होते.
 • F– मासिक पाळीच्या काळात शरीराच्या अकारण ओढाताणीमुळे मुळे स्त्रीयांना कंबरदुखीचा त्रास होतो. त्यावर उपयोगी पडणाऱ्या रज :प्रवर्तक चुरणा मध्येही हिंगाचा वापर केल्याचे आढळते.
 • G— कफ विकारांमध्ये हिंगाचा उपयोग होतो.
 • H— डोळ्यांच्या त्रासामुळे डोकेदुखी उद्भवते अशावेळी हिंगाचा उपयोग केलेल्या हिंग्वाभाघृत मुळेही डोळ्यांच्या विकारांवर आराम पडतो.
 • I– हिंग कापसामध्ये गुंडाळून कानात ठेवल्यास दडे बसण्यामुळे होणार त्रास आटोक्यात येतो.भाजलेला हिंग कापसात गुंडाळून दुखऱ्या दाताखाली ठेवल्यास दात किडल्याने,दात दुखू लागल्याने होणारा त्रास बरा होतो. हिंग पाण्यात घालावा व ते पाणी थेंब दोन थेंब नाकात सोडले असता अर्धशिशीवर आराम मिळतो. हिंग तिळाच्या तेलात घालून गरम करावा व कोमट झाल्यावर कानात चार-पाच घातल्यास कान दुखणे थांबते.
 • J– मुलांना पोटामध्ये कळ येऊन दुखत असेल तर बेंबीजवळ हिंगाचा लेप दिला असता वायू बाहेर पडून जातो व आराम वाटतो.
 • K– हिंगाच्या छोट्या छोट्या गोळ्या करून तुपाबरोबर खाल्ल्याने अजीर्ण व वात गोळा दूर होतो.

काही महत्वाचे –हिंग उष्ण असल्याने पित्तप्रकोपाचा त्रास असणाऱ्यांनी हिंगाचे सेवन जरा जपून करावे.

tags – heeng हिंग खाण्याचे नुकसान, हिंग खाण्याचे फायदे, hing in english hing plant, हिंग समानार्थी शब्द मराठी asafetida, पुरुषों के लिए हींग के नुकसान. Hing khanyache fayde, hing khanyache tote, is hing good for health, hing health benefits in marathi, Hing information in Marathi.

Comments are most welcome and appreciated.