September 23, 2023

ज्वारी खाण्याचे फायदे व पदार्थ in Marathi Jwari che fayde ani padarth.

ज्वारीचे फायदे व पदार्थ – Jwari che Fayde ani Padarth.

ज्वारी खाण्याचे फायदे व पदार्थ in Marathi Jwari che fayde ani padarth.
ज्वारी खाण्याचे फायदे व पदार्थ in Marathi Jwari che fayde ani padarth.

ज्वारी खाण्याचे फायदे in Marathi.

 1. ज्वारी थंड, गोड, रक्तविकारहारक, पित्तशामक, रुक्ष असून कफ व वायुकारक आहे. पांढरी ज्वारी बलदायक व पथ्यकारक असून. मूळव्याध, अरुची, व्रण पडणे यावर उपयोगी पडते.लाल ज्वारी पौष्टिक,थंड, गोड, बलदायी,त्रिदोष हारक मात्र किंचित कफकारक असते.
 2. गुरे धष्टपुष्ट होण्यासाठी त्यांना ज्वारीच्या पिकाचा कडबा खाऊ घालतात.
 3. ज्वारीच्या लाह्या खाल्ल्याने कफ कमी होतो
 4. ज्वारीपासून बनवलेली गंजी कप व वायुनाशक असून मुळव्याध व प्रमेह यावर गुणकारी ठरते
 5. भाकरी थंड व वायु कारक असते
 6. ज्वारीमध्ये मिनरल्स, पोटॅशियम, मॅग्नेशियम चे प्रमाण असते त्यामुळे ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते.
 7. महिला वर्गामधील मासिक पाळीआणि गर्भाशयाच्या समस्यांवरही ज्वारी उपायकारक ठरते.
 8. ज्वारी मध्ये तंतुमय पदार्थ असतात त्यामुळे त्याने पोट साफ राहते , तसेच पित्ताचा त्रास असणाऱ्यांनी चपाती ऐवजी ज्वारीचं भाकरी खाणे फायद्याचे असते
 9. ज्वारीमध्ये लोह मुबलक प्रमाणात असते त्यामुळे ऍनीमिया सारखा आजार असणाऱ्या व्यक्तींनी ज्वारीचे पदार्थ खाल्यास चांगला फायदा होतो.
 10. सध्याचा राहणीमानामुळे लठ्ठपणाचे प्रमाण खूपच वाढले आहे , आणि लठ्ठपणा म्हणजेच आजारांना निमंत्रण. आहारात भाकरीचे सेवन केल्यास लठ्ठपणा/चरबी कमी होण्यास मदत होते
 11. ज्वारी रक्तवाहिन्यांमधील कोलेस्टेरॉल चे प्रमाण कमी करण्यासही मदत करते.
 12. ज्वारीतील पोषक तत्वे मुतखड्यावर आळा घालतात, तर किडनीस्टोनचा त्रास असलेल्या व्यक्तीने ज्वारीची भाकरी व इतर प्रकारचे ज्वारीचे पदार्थ खाल्ल्यास फायदा होतो.

फायबर युक्त पदार्थ मराठी माहिती – fiber in food information in Marathi.

ज्वारीचे पदार्थ in Marathi.

ज्वारीचे पदार्थांही बरेच आहेत. जसे कि भाकरी, थालीपीठ, धिरडे,आंबील.

ज्वारीच्या पिठाची भाकरी –भाकरी करताना दहा भाकरी करायच्या असतील तर एक वाटी पाणी गरम करून पिठात घालणे व लागेल तास पाणी घालत मळून घेणे. भाकरी ठापून तव्यावर टाकणे वराच्या बाजूला पाणी लावणे. पाणी जरा सूक्त आल्या आल्या उलटून घेणे व व्यस्थित भाजणे.

थालीपीठ -ज्वारीच्या पिठात थोडासा चणा डाळीचे पीठ बारीक चिरून कांदा, हिरवी मिर्ची, ओवा,जिरे, मीठ कोथिंबीर,घालून थालीपीठ करून घेणे.

आंबील –एक वाटी ज्वारीचे पीठ घेऊन पाण्यात भिजून घेणे. अर्धा लिटर पाणी उकळायला ठेवणे. पाणी उकलत आलं कि तयात भिजवलेले पीठ चमच्याने हलवत घालणे व तसेच एकजीव होईपर्यंत हलवत राहणे फार घट्ट झालं तर वरून पाणी घालणे चवीला मीठ घालून घेणे.असे बरेच पदार्थ करता येतात. ज्वारीचे सांडगे ही छान होतात.

tags – Jwariche fayde in marathi, Jvari khanyache fayde, Jwari mahiti in marathi, jwarichi bhakri benefits in marathi, ज्वारीची भाकरी खाण्याचे फायदे, ज्वारी खाण्याचे फायदे, ज्वारीचे पदार्थ, ज्वारीच्या पिठाची भाकरी,

2 thoughts on “ज्वारी खाण्याचे फायदे व पदार्थ in Marathi Jwari che fayde ani padarth.

Comments are most welcome and appreciated.