December 3, 2023

Milk dairy products information in Marathi – Benefits, Uses & demerits.

1- Dudh – Milk dairy product information in Marathi.

प्राचीन काळापासून माणसाला आवडणारे पेय म्हणजेच दुध. अगदी लहान मुलांपासून मोठ्यानं पर्यंत जवळ जवळ सर्वांनाच दूध आवडते. आणि दुधाला तर पृथ्वीवरील अमृत म्हणतात. आपल्याला जे दूध मिळते यामध्ये सर्वसाधारणपणे क्रमवर मांडणी करायची झाल्यास प्रथम आईचे व दुसरे गाईचे दूध सर्वोत्तम मानले जाते.दूध मधुर, स्निग्ध, सरक, वीर्यवृद्धी करणारे, वायू व पित्तहरक, पौष्टिक, बलकारक, बुद्धीवर्धक थंड व जीवन दायक असते.

Milk dairy products information in Marathi - Benefits, Uses & demerits.
Milk dairy products information in Marathi – Benefits, Uses & demerits.

Milk information, Benefits, Uses and Disadvantages in Marathi.

A– दुधावरील सायअर्थात मलई थंड, गोड, पचण्यास जड, स्निग्ध, पौष्टिक कफकारक व धातुवर्धक असून, पित्त व वायू कारक, रक्त पित्त व रक्त दोषनाशक असते. ज्यांना दूध पचत नाही अशांनी त्यात सुंठ, वेलची,दालचिनी,पिंपळमूळ असे पाचक पदार्थ टाकून उकळून प्यावे. मात्र अशक्त व आजारी माणसांना दूर अति उकळून व घट्ट करून देऊ नये. दूध उकळल्याने त्यातील पोषक घटक कमी होतात व ते पचावयास जड जाते. दुधात साखर घालून प्यायले असता ते कफवर्धक व वायुनाशक असते. तर खडीसाखर घालून घेतल्यास वीर्यवर्धक व त्रिदोष हारक असते. सकाळचे दूध हे संध्याकाळच्या दुधापेक्षा थंड परंतु पचावयास जड असते.

B— सकाळी दूध पिणे वीर्यवर्धक, बलदायक जठराग्नी प्रदीपक असून. दुपारी प्यायलेले दूध बलदायक, पित्तनाशक व जठराग्नी प्रदीपक असते.रात्री प्यायलेले दूध बुद्धिवर्धक आरोग्यकारक असून मन व शरीर शांत व स्वास्थ्यवर्धक ठेवणारे असते.

C– गाईचे दूध शितल, स्निग्ध,जड,मंद,स्वादिष्ट तसेच रक्तपित्त, वात पित्तनाशक असते. म्हशीचे दूध मधुर, स्निग्ध जड, थंड भूक वाढविणारे झोप आणणारे, जठराग्नी मंद करणारे असते.तर काहींच्या मते म्हशीच्या दुधापेक्षा गायीचे दूध सेवनासाठी अधिक गुणकारी असते.

D– बकरीचे दूध मधुर, शितल,हलके असून खोकला, ताप अतिसार,क्षय, रक्तपित्त यामध्ये फायदेशीर ठरते.

E– गाईचे धारोष्ण दूध,बकरीचे गरम करून थंड केलेले दूध, मेंढीचे उकळलेले गरम दूध, तर म्हशीचे काढल्यावर थंड झालेले दूध अधिक गुणकारी असते असे मानले जाते.

F– उचकी लागली असता गाईचे दूध गरम करून प्यावे.

F– जुनाट ताप असता गायीच्या दुधात सुंठ व काळ्या मनुका ठेचून घालून ते उकळावे व मग प्यावे.

G– सर्दी झाल्यास गाईचे दुध गरम करून त्यात खडीसाखर व मिरपूड घालून प्यायल्याने सर्दी वर लवकर उतारा पडतो.

H– शारीरिक कष्ट केल्याने थकवा येतो.अशा वेळेस गरम गरम दूध साखर घालून प्यावे तरतरी येते.

I– डोळे दुखत असल्यास गाईच्या दुधात कापूस भिजवून डोळ्यांवर ठेवावा व त्यावर थोडी तुरटीची पूड टाकावी.

J– गाईचे दुध गरम करून त्यात तूप व साखर घालून प्यायल्याने मूत्र कुच्छ हा विकार बरा होतो.

K– डोके जर जास्त प्रमाणात दुखत असेल किंवा ठणकत असेल तेव्हा गायीच्या दुधात सुंठ उगाळून मस्तकावर त्याचा लेप लावा तसेच त्यावर कापूस पसरून ठेवावा लवकर आराम पडतो.

L– त्वचा व चेहरा तेजस्वी कांती मान तजेलदार दिसावा यासाठी दुधावरील साय दहा-पंधरा मिनिटे तोंडावर तोडावी अर्ध्या तासाने चेहरा बेसनाच्या पिठाने स्वच्छ धुवावा.

M– मुरडा झाल्यास गायीचे दूध व पाणी समप्रमाणात घेऊन आटेपर्यंत दूर उकळावे व प्यावे.

N– गाईच्या दुधात पाचपट पाणी घालून पाणी आटेपर्यंत दूध उकळावे व थंड करून घ्यावे रक्तपित्ता मध्ये याचा फायदा होतो.

O– अर्धशिशी झाल्यास दूध आटवून त्याचा खवा करावा व त्यात साखर घालून खावा अर्धशिशीवर आराम मिळतो.

P– शरीर धष्टपुष्ट व्हावे, बलदायी व्हावे,विर्य वृद्धी व्हावी म्हणून गरम दुधात तूप व साखर घालून प्यावे.

Q– अंगावर पुरळ उठल्यास,सूज येऊन ठणका लागल्यास गायीच्या निरशा दुधात कापूस बुडवून दुखऱ्या जागी लावा.

R– भोवळ, चक्कर आल्यास गायीच्या दुधात सुंठ उगाळून त्यात खडीसाखर घालून प्यावे.

S– दुधाबरोबर साखर,आले, सुंठ,आवळा वापरता येतो. परंतु सेंधवा शिवाय इतर क्षार तसेच आवळ्या व्यतिरिक्त इतर आंबट पदार्थ कांदा,मासे, गुळ, मूग, लसूण, दारू, भाजी-फळे घेणे टाळावे.तो विरुद्ध आहार आहे असे समजावे.

Very impA– नासलेल्या दुधाचा वापर करू नये.B–कफ, खोकला, दमा, गॅसविकार, अपचन, अतिसार, आदी विकार असणाऱ्यांनी दुधाचे सेवन टाळवेत.

Also Read – Bajri, Tandul & Makka grains information in Marathi

tags – दूध माहिती, तूप माहिती, दुग्धजन्य पदार्थाचे फायदे, ताक माहिती, लोणी चे फायदे, दही खाण्याचे फायदे, दह्याची माहिती

2- दही / Curd / Yogurt dairy product information & benefits.

दुधात विरजण घालून दह्याची निर्मिती होते. फारसे अंबट नसलेले मधुर व चांगले लागलेले दही उत्तम प्रकारचे असते.

दही / Curd / Yogurt dairy product information & benefits.
दही / Curd / Yogurt dairy product information & benefits.

दही खालील पैकी पाच प्रकारात मोडते -Types of Curd/Yogurt.

1–जे दही अदमुरे, अर्धवट लागलेले असते असे दही वात पित्त व कफ निर्माण करते.

2– चांगले लागलेले, मधुर थोडे आंबट, चवदार असे दही वायुनाशक, मधुर,रक्तपित्ता हारक मेद व कफकारक असते.3– चांगले लागलेले गोडे व साधारण तुरट असे लागणारे दही.4– आंबट दही, जे अग्नि प्रदीपक परंतु रक्त पित्तकारक,रक्त दूषित करणारे,कफवर्धक असते.5– अति आंबट व ज्यांच्या सेवनाने दात आंबट होतात अंगावर शहारे येतात असे दही उपयोगी न पडणारे त्रीदोष उत्पन्न करणारे असते.

A– दही स्वादिष्ट, आंबट, उष्ण,पौष्टिक,स्निग्ध, बलवर्धक असते. दह्याची निवळी गोड हलकी भूक वाढवणारी बलदायक, तृप्ती दायक असते.

B– दह्यात साखर घालून खाल्ल्यास रक्त पित्तदोष दाह कमी होतात. दही तृषा शामक,पित्तनाशक, पाचन शक्ती वाढवणारे असते.

C–सर्दी झाल्यास ताज्या दह्यामध्ये मिरपूड व गूळ घालून खावे.

D– मुरडा झाल्यास दह्यात शंख जिऱ्याची पूड घालून खावे.

E– सूर्योदयापूर्वी दहीभात आठवडाभर खावा अर्धशिशीवर फायदा मिळतो.

F– दही व गूळ खाल्ल्यास कफाचा जोर कमी होतो.

G– रात्री दही खाणे टाळावे. क्षय, सर्दी, त्याचप्रमाणे कफ विकाराचा त्रास असणाऱ्यांनी दह्याचे सेवन टाळावे. शरद, ग्रीष्म, वसंत ऋतूमध्ये दह्याचे सेवन शक्यतो टाळावे.

Also Read – Onion as a spice – Taste & Uses in Cooking

3- ताक – buttermilk dairy product information & benefits in Marathi.

दही घुसळून त्यात पाणी घालून नंतर ताक बनवण्यात येते. ज्यांना दूध आवडत नाही, पचत नाही अशांनी ताक प्यावे. दह्यापासून ताक,लस्सी व कढी बनवण्यात येते. ताकामुळे मळ दोष दूर होतात. मळाचा निचरा होतो. आतड्यांमध्ये साचून राहिलेला मळ आंबटपणा, चिकटपणा दूर होतो.

3- ताक - buttermilk dairy product information & benefits in Marathi.
3- ताक – buttermilk dairy product information & benefits in Marathi.

A– ताप थंड हलके वायूहारक, कफकारक,पित्त, श्रम, तृषा नाशक असते.ताकात मीठ घातल्याने ते अग्निदीपक बनते. ताक उलटी होणे,मेद वाढणे, पोटात वायू गोळा उठणे, भगंदर प्रमेह,अतिसार,पांडुरोग ,अरुची, पोटातील व्याधी, सूज, कोड, कृमी या सर्व विकारांवर फायदेशीर ठरते.

B– ताकाने रोज चेहरा चोळून चोळून धुतल्याने तोंडावरील चिकटा, काळेपणा मुरुमे पुटकुळ्या चे डाग दूर होऊन चेहरा आकर्षक,तेजस्वी आणि तुकतुकीत झाल्याचे दिसून येते.

C– पोटात कृमी झाले असता ताकामध्ये वावडिंगाचे चूर्ण घालून प्यावे.

D– जेवल्यावर पोटात गुबारा धरल्यास ताकात पिंपळी, चवक,चित्रक, पिंपळमूळ, सुंठ यांचे चूर्ण करून घालावे असे ताक प्यायल्याने बराच फायदा होतो.

E– रक्तातिसार,मुरडा,अतिसार झाल्यास ताज्या ताकात बेल फळातील गर घालून प्यावे.

F– अजीर्ण झाल्यास ताकात सैंधव व मिरपूड घालून प्यावे.

G– ओटी पोटात दुखत असल्यास. अतिसार व मुळव्याध झाल्यास. ताज्या दह्याचे ताक करून त्यात हिंग, जिरे पूड व सैंधव घालून प्यावे.

H– शरीराचा दाह होत असल्यास. गाईच्या दुधापासून बनवलेल्या दह्याचे ताक काढून.त्यात एक फडके बुडवून सतत शरीरावर ठेवावे.

I– गाईच्या दुधापासून बनलेल्या दह्या पासून तयार केलेले ताक प्यायल्याने रक्त शुद्ध होते. वात व कफ व्याधी दूर होतात. शरीर ताजेतवाने राहते.

J– संग्रहणी चा त्रास असणाऱ्यांनी गाईच्या दुधाच्या ताकात सुंठ व पिंपळी चूर्ण घालून केलेले ताक प्यावे व आहारात ताक भाताचे सेवन करावे.

K– अजीर्ण झाल्यास ताकात सुंठ, मिरे पूड,सैंधव,पिंपळी मूळ समप्रमाणात घालून प्यावे.

M- तोंड आल्यास ताकाच्या गुळण्या कराव्यात.

N– गळ्यावर किंवा मानेवर मळाचा चिकट राप असल्यास, अंघोळीपूर्वी त्यावर आंबट ताक खसखसून चोळावे व पंधरा वीस मिनिटाने आंघोळ करावी.

O– मुळव्याध झाल्यास ताकामध्ये चित्र कमुळाच्या सालीचे चूर्ण घालून रोज घेतल्याने मूळव्याधीच्या विकारा मधून लवकर मुक्तता होते.

P– पातळ ताक वरचेवर प्यायल्याने लघवीला साफ होते.

काही महत्वाचे (imp)–1) शरीरावर कोणतीही जखम झाली असेल किंवा सूज चढली असेल. त्याच प्रमाणे शरीर दुर्बल झाले असेल तर ताकाचे सेवन टाळावे.तसेच रक्तपित्त, भ्रम, मूर्च्छा आदींचा त्रास होणाऱ्यांनी, चक्कर येण्याचे प्रमाण जास्त असणाऱ्यांनी ताकाचे सेवन करू नये. (2) शक्यतो ताकाचे सेवन संध्याकाळी करू नये.

You may like – 13 Wheat benefits in Marathi – गहू खाण्याचे फायदे

4- लोणी – Butter dairy product information, benefits & uses in Marathi.

दही घुसळून ताक करून त्यातून लोणी काढले जाते अत्यंत मुलायम, पचण्यास तुपापेक्षा ही हलके असे लोणी स्वादिष्ट असते. लोणी गोड, थंड, हलके,पौष्टिक,जुलाबात गुणकारी, बुद्धिवर्धक असून शरीरास बळ प्राप्त करून देते.

4- लोणी - Butter dairy product information, benefits & uses in Marathi.
4- लोणी – Butter dairy product information, benefits & uses in Marathi.

A– जुन्या तापामध्ये गाईच्या दुधापासूनचे लोणी घेऊन त्यात खडीसाखर मिसळून खाल्ले जाते.

B– गाईच्या दुधापासून चे लोणी व तीळ एकत्र करून खाल्ल्याने मुळव्याधीवर उतारा पडतो.

C– रक्तातिसार झाल्यास लोण्यात मध व खडीसाखर मिसळून खावे.

D- डोळ्यांची आग होत असल्यास गाईच्या दुधापासून चे लोणी डोळ्यांवर चोळावे.

E– निवडुंगाच चीक डोळ्यात गेल्यास डोळ्यात लोणी घालावे.

F– अंगात कडकी मुरल्यास चमचाभर लोणी खडीसाखर एकत्र करून आठवडाभर घ्यावी.

G– शौचाला न होणे,अपचन,तोंड येणे यावर लोणी, जिरेपूड, साखर एकत्र करून खावे.

H– चमचाभर लोणी थोडीशी सुंठ पूड घालून सकाळी जेवणापूर्वी अर्धा तास घेतल्याने भूक लागते.

काही महत्वाचे (imp)– शिळे लोणी अजिबात खाऊ नये. शिळे लोणी खारट,आंबट असून त्यामुळे उलटी,कोड आदींचा त्रास होतो कफ होतो तसेच मेद वाढतो.

tags – दूध माहिती, तूप माहिती, दुग्धजन्य पदार्थाचे फायदे, ताक माहिती, लोणी चे फायदे, दही खाण्याचे फायदे, दह्याची माहिती

Also read – ज्वारी खाण्याचे फायदे व पदार्थ in Marathi Jwari che fayde ani padarth.

5 – तूप – Ghee Clarified butter information in Marathi.

तूप - Ghee Clarified butter information in Marathi.
तूप – Ghee Clarified butter information in Marathi.

लोणी कढवून त्यापासून तूप तयार करतात.सर्व प्रकारच्या तुपा पेक्षा गाईचे तूप श्रेष्ठ असते. तुपाच्या सेवनाने धातू वृद्धी होऊन शक्ती वाढते. उष्णता दूर होते.रक्त शुद्धी होते. मेंदू शांत राहतो. तूप खूप जलद गतीने पचते व त्याचा रस रक्तात मिसळतो.आहारामध्ये नवीन तुपाचा वापर केला जातो. परंतु औषध निर्मितीसाठी जुने तूप खूपच फायदेशीर ठरते. घरात तुपाचा दिवा लावल्याने, वातावरणातील सूक्ष्म जंतूंचा नाश होतो.

A- शरीरातील वात,कफ,पित्त यांचे संतुलन तुपामुळे राखले जाते.शरीरातील वाताचे वाढलेले प्रमाण देखील तुपाचा योग्य सेवनाने कमी होते. तुपामुळे क्षीण झालेल्या कफाचे पोषण होते.अग्निमांद्य दूर करून,जठराग्नी प्रदीप्त करून, पित्ताचे प्रमाण व्यवस्थित करणे हे तुपाचे कार्य आहे.

B– तूप मधुर, पित्त- वायुनाशक, अग्निदीपक, कांती, बळ, तेज, बुद्धीवर्धक, स्मरणशक्ती,उत्साह वाढवणारे जड, स्निग्ध, कफकारक असून,ताप, शूळ उठणे, व्रण पडणे क्षय होणे, रक्तदोष यावर गुणकारी ठरते.

C– जुन्या तुपाचा लेप लावल्याने नाडीव्रण बरे होतात.

D– डोळ्यात चुना गेल्यास डोळ्यात तूप घालावे त्याने आराम वाटतो.

E-– गाईचे कोमट तूप प्यायल्याने उचकी थांबते.

F– नाकातून रक्त पडत असेल तर गायीच्या तुपाचे थेंब नाकात सोडावे.

G- पित्त वाढल्याने डोके दुखत असल्यास,गायीचे तूप डोक्यावर तसेच कानशिलावर चोळावे आराम मिळतो.

H– डोळ्यातील शिरा लाल होणे, डोके दुखणे यावर गायीचे ताजे तूप व दूध एकत्र करून डोळ्यात घालावे.

I– गाईचे तूप व दूध एकत्र करून प्यायल्याने तृषा विकार दूर होतो.

J– रात्री झोपताना कपभर दुधामध्ये चमचाभर तूप घालून प्यायल्याने शौचास साफ होते,मलावरोध होत नाही.

K– गाईचे जुने तूप सकाळ-संध्याकाळ सात दिवस नस्य मार्गाने घेतल्यास किंवा नाकात तुपाचे थेंब सोडल्याने अर्धशिशी थांबते.

L– गाईचे तुप भाजलेल्या जागेवर चोळल्यास भाजल्यामुळे होणाऱ्या जखमांचे व्रण नाहीसे होतात.

M– हातापायांची आग होत असेल किंवा शरीरात उष्णतेचे प्रमाण वाढल्यास गाईचे तूप हातापायांच्या तळव्यांना घासावे.

N– शीतपित्ता मध्ये तुपात सैंधव घालून त्याचा लेप करावा.

O– दमा धाप लागणे यामध्ये गरम पाण्यात गायीचे तूप, मध व सैंधव घालून दोन चार दिवस खावे.

P– ज्यांना उष्णतेचा त्रास होतो अशांनी जेवणामध्ये गाईच्या तुपाचा वापर करावा.

Q– कानात मळ झाल्यास तुपाची निवळी कानात घालावी.

R– भाजलेल्या जखमेवर तूप लावल्यास जखम लवकर भरून येते.

S– उलटी होत असल्यास गाईच्या तुपात सैंधव घालून देतात.

महत्वाचे (imp)– पचनशक्ती पाहून तूप खावे. अतिरेकी प्रमाणात तूप खाल्ल्याने तर अधिक नुकसान होते. तूप न पचल्याने सुस्ती येणे,मुरडा, कृमी,कफ, ताप,जुलाब मेद आदी विकार सतावतात. क्षय विकार, कफ,मंदाग्नी, आम्लपित्त, दमा, बैठे काम करणाऱ्या व्यक्ती यांनी तुपाचे अमर्याद सेवन टाळावे. आमदोष असता तुपाचे सेवन केल्याने मळ चिकट व दुर्गंधीयुक्त होतो. तोंडाला तसेच दातांना घाण वास येतो.यास्तव तुपाचे सेवन टाळावे किंवा बेतानेच तूप खावे.

Must read – 5 Tasty & Easy Raksha Bandhan coconut recipes in Marathi

tags – Dudh, dahi, tak, loni, tup yanchi purn mahiti. Upyog, fayde v tote, indian dairy products information in Marathi, buttermilk information in marathi, ghee & butter information, indian dairy products information in Marathi

3 thoughts on “Milk dairy products information in Marathi – Benefits, Uses & demerits.

Comments are most welcome and appreciated.