परदेशात जॉब का करावा? 8 Reasons to work in Abroad in Marathi.

परदेशात जॉब का करावा? why you should work in Abroad in Marathi?

परदेशात जॉब का करावा?  why you should work in Abroad in Marathi?
परदेशात जॉब का करावा? why you should work in Abroad in Marathi?

Also Read – Top 10 sites for job search in 2021

परदेशात जॉब का करावा? कारणे – Reasons to work in Abroad in Marathi?

  1. पगार नक्की आपल्या देशापेक्षा जास्त असतो. बहुतेक वेळेस पगारा व्यतिरीक्त काही ना काही फॅसिलीटी कंपन्या उपलब्ध करतात अशाने सेव्हीग वाढतात.
  2. परदेशी असताना तुम्ही “विस्थापित” असता. विस्थापित नेहमीच प्रस्थापित होण्यासाठी प्रचंड मेहनत करतात, फोकस्ड असतात. उदा. महाराष्ट्रातील उत्तरभारतीय बांधव. आणि म्हणूनच भविष्यात ते योग्य प्रकारे एस्टॅब्लिश होतात.
  3. तुम्ही जेव्हा देशाटन करता, नवनविन संस्कृती पाहता, लोक पाहता, चालीरिती पाहता, वाचन करता तेव्हा तुमचे जीवन अनुभवसमृद्ध होते. व्हिजन क्लिअर होते. अनेक बंधने गळून पडतात. धाडस वाढते…
  4. पाश कमी असल्याने तुमही तुमच्या मुख्य नोकरी बरोबर जोडधंदा किवा काहीतरी 2nd Income करू शकता, किंवा शिकू शकता. अशाने तुमचा संपर्क वाढतो, अनुभव वाढतो. अधिक अर्थार्जन होते. तुम्ही कितीही म्हटले तरी तुमच्या गावी हे तुम्ही करणार नाही. उदा. अमरीकेत संध्याकाळी ४ तास पेट्रोलपंपावर जॉब करायला तुम्हाला लाजही वाटणार नाही. पण हे तुमच्या गावी किंवा पुण्यात कराल का??
  5. जेव्हा तुमच्या देशाबाहेर तुम्हाला संधी मिळते तेव्हा पहिली गोष्ट लक्षात घ्या की ती केवळ संधी नाही. हे तुमच्या पात्रतेचे सर्टीफिकेट आहे किंवा तुमची खरी किम्मत आहे. ती ओळखा. ती वाढवा. हे दोन्ही इकडे राहून होणार नाही..
  6. तुम्ही जाताच आहात तर भविष्यात तुमचे मित्रपरीवारातील काही लोकांना देखील तुम्हाला तिकडे बोलवून घेता येईल का ह्या दृष्टीने प्रयत्न करा. केनया-नायजेरीया सारख्या देशांमधे गुलाम/नोकर म्हणून गेलेल्या गुजराथी/मारवाडी समाजाने आज त्या देशांच्या इकॉनोमी ताब्यात घेतल्या आहेत हे खूप कौतुकास्पद आहे..
  7. आणि ह्या सर्वांबरोबर भविष्यात तुमच्या पत्नीला, आई-वडीलांना कुटूंबाला कसे तिथे नेता येईल ह्याचा प्रयत्न करत रहा. अशाने तुम्हाला कुटूंबापासून दूर रहावे लागणार नाही. कुटूंबाची खरी किम्मत तुम्हाला लांब राहूनच कळणार आहे.
  8. देशभक्ती वगैरेच्या विषयात कृपया अडकू नका. आधी स्वत: सक्षम व्हा आणि मग देशाची आठवण ठेवा. उगाच देशभक्तीची नशा डोक्यात भिनवून इथे राहून इकडच्या नेत्यांच्या नादी लागून आयुष्य बरबाद करण्यापेक्षा स्वत: सक्षम व्हा. पात्र तर तुम्ही आहातच..

You may like – Top tech skills in Demand 2021

tags – Abroad jobs tips in Marathi, Reasons to work in Abroad in Marathi, Benefits of Working abroad in Marathi, why marathi people should work in Abroad? परदेशात जॉब का करावा?

ketanblogger

I am a welding expert completed diploma in mechanical engineering, Blogging as a hobby, I love to help fellow bloggers to solve their issues and help them monetize their websites. I teach people how to earn money online.

View all posts by ketanblogger →

Comments are most welcome and appreciated.