September 23, 2023

Eyebrow Dandruff home remedies in Marathi – भुवयांमधील कोंड्यावर उपाय

भुवया मधील कोंड्या पासून त्रस्त आहात का मग हे वाचा.

केसात कोंडा होणे ही एक सामान्य समस्या आहे. परंतु काही कारणामुळे आपल्याला आयब्रोज मधील कोंड्या सही सामोरे जावे लागते.कोंड्याच्या समस्ये बरोबरच त्याची कारणेही आपल्याला माहिती असावी.

Eyebrow Dandruff home remedies in Marathi -  भुवयांमधील कोंड्यावर उपाय
Eyebrow Dandruff home remedies in Marathi – भुवयांमधील कोंड्यावर उपाय

You may like – How to Make hair silky & smooth. Natural homemade tips in Marathi.

Eyebrow Dandruff home remedies in Marathi – भुवयांमधील कोंड्यावर उपाय

कोंडा म्हटलं की टाळूवर उद्भवणारी समस्या असे सामान्यतः समजले जाते.पण प्रत्यक्षात तसे नाही टाळू व्यतिरिक्त आयब्रोज मध्ये देखील कोंडा होऊ शकतो. अशा स्थितीत जर तुमच्या भुवयांवर कोंडा असेल तर भुवया पांढऱ्या दिसू लागतात आणि या ठिकाणच्या त्वचेस घासल्यास ते वेगळे दिसू लागते तथापि जसे आपण केसांमधील कोंड्यासाठी उपचार करतो त्याचप्रमाणे आयब्रोज मधील कोंड्याची ही काळजी घेणे महत्त्वाचे आहे कारण भुवया हा आपल्या चेहऱ्यावरचा एक महत्त्वाचा भाग आहे

अशा परिस्थितीत जर भुवयांवर कोंडा असेल तर ते अजिबात चांगले दिसत नाही विशेषतः चेहऱ्यावर मेकअप लावल्यानंतर भुवयांवर कोंडा अधिक स्पष्ट दिसून येतो सामान्यतः ज्या लोकांचे त्वचा खूप तेलकट असते त्यांना अशाप्रकारे कोंडा होण्याची शक्यता असते.याशिवाय सोरायसिस एक्झिमा किंवा कोणत्याही प्रकारच्या एलर्जी मुळे ही समस्या उद्भवते परंतु अशा प्रकारच्या समस्येपासून मुक्त व्हायचे असेल तर आपण घरगुती उपाय अवलंबू शकतो.

Also Read – Natural silky hair with homemade shampoo & Conditioner.

Natural Remedies for Eyebrow Dandruff in Marathi – भुवयांमधील कोंड्यावर उपाय

  1. कडुनिंबाचे तेल-कडुनिंबाचे तेल अंटी फंगल आणि अँटी इन्फलामेटरी गुणधर्माचे असते.त्यामुळे कापसावर थोडे कडुलिंबाचे तेल घेऊन ते रोज भुवयांवर लावा यामुळे तुम्हाला कोंड्याच्या समस्येपासून सुटका मिळेल.
  2. बदाम तेल –बदामाचे तेल जस्त जीवनसत्व तसेच फ्याटी ॲसिडसनि समृद्ध असते.याचा वापर करून तुम्ही भुवया निरोगी ठेवू शकता.हे तेल लावणे आधी हलके गरम करावे.त्यानंतर बोटांनी भुवयांवर लावा आणि हलक्या हाताने मालिश करा दुसऱ्या दिवशी स्वच्छ पाण्याने धुवा.
  3. मेथीची दाणे –मेथी मध्ये केवळ अँटी फंगल गुणधर्मच नाहीत तर अमिनो ऍसिड चे गुणधर्म देखील आहेत.जे सहजतेने त्वचेचे ईस्ट काढण्यास मदत करतात मेथी वापरताना एक चमचा मेथी रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा दुसऱ्या दिवशी त्याची पेस्ट करून भुवयांवर लावा हलक्या हाताने चोळून घ्या व काही मिनिटे तसेच राहू द्या नंतर थंड पाण्याने धुवा
  4. कोरफड जेल –कोरफडीच्या जेलमुळे त्वचेस आद्रता मिळते त्यामुळे खाज किंवा जळजळ यासारख्या समस्या दूर होतात हा सर्वात सोपा उपाय आहे घरी कोरफड लावली असेल तर त्याची ताजी पानं कापून त्यातील जेल काढून लावली तरी उत्तम कोरफडीचा गर काढून भुवयांवर चोळून लावा आणि अर्धा तास तसेच राहू द्या नंतर थंड पाण्याने धुवा कोरफड लावण्याची सवय ठेवल्यास भुवया मध्ये कोंडा होण्याची समस्या कायमची दूर होते

Must read – पावसाळ्यात केसांची निगा कशी राखावी? Monsoon hair care tips in Marathi.

Comments are most welcome and appreciated.