
Table of Contents
Homemade Shampoo & Conditioners to make hair silky & smooth naturally.
आपल्या आयुर्वेदात खुप छान औषध आहेत. तसेच आपल्या सुंदरतेची काळजी घेणारे खूप उपाय आहेत. आपण ते पाहणार आहोत. आज आपण केसांसाठी चे घरगुती हेअर पॅक पाहुयात.
These are Marathi tips for Naturally taking care of your hairs with homemade shampoo, conditioners and hair packs. We are also going to replicate this article in English for our readers from english countries so follow below Link for English Article.
How to make hair silky and smooth naturally with homemade shampoo and conditioners? English DIY article.
Natural Homemade hair pack – remedy for hair fall, Split hairs.(Marathi)

जर तुम्हाला हे सर्व बनवायला वेळ देत येत नसेल तर प्रत्येक रेसिपी खाली online natural शाम्पू आणि कंडिशनर ची लिंक दिली आहे तेथून घेऊ शकता.
1-मेहंदी पॅक – Homemade Mehndi/Henna hair Pack.
साहित्य – 10ग्रॅम मेहंदी. 5ग्रॅम शिकेकाई पूड. 5ग्रॅम आवळा.5ग्रॅम ब्राम्ही पावडर. 2ग्रॅम मुलतानी माती. 2ग्रॅम कॉफी पावडर. अर्धा चमचा आंबे हळद पावडर 5 चमचे भृंगराज पावडर. 1अंडे. 1वाटी दही.
कृती वरील सर्व पावडर दह्यामध्ये मिक्स करा. त्यात अंडे घालून चांगले फेटून मिश्रण एकजीव करून घ्या. झाला आपला पॅक तयार. आता तो पॅक केसांच्या मुळापासून टोका पर्यन्त छानसा लावून घ्या. कमीत कमी दीड ते दोन तास ठेवा. शाम्पू ने केस धून घ्या. या पॅक चा वापर आठवड्यातून 1/2 वेळा केला तरी चालेल. यामुळे केसांना छान पोषण मिळते. केस गळती. फाटे फुटणे कमी होते.
Above mehndi pack will make your hairs healthy and will prevent hair fall and split hairs problem.
2- शिकेकाई व आवळा पॅक – Homemade Shikakai hair pack to make hair silky.
साहित्य – 2अंडी. 2केल्याचं गर. पिकलेली केळी तर जास्त छान. प्रत्येकी 2 चमचा आवळा, रिठा, शिकेकाई, मेथी पावडर. एक चिमूटभर काळी मिरी पावडर.
कृती – वरील सर्व साहित्य एकत्र करून. मिक्सर ला फिरून घेणे. केसांच्या मुळा पासून टोका पर्यंत लावणे. 40 ते 60 मिनटं ठेवणे. व शाम्पू ने धुऊन घेणे या पॅक ने केसांना पोषण मिळून केस मुलायम होतात.
This Acacia concinna shampoo will give you healthy & shiny hair.
Homemade Natural shampoo Recipes in Marathi.

Buy Natural shampoos & Homemade shampoos Recipes
कोरफड शाम्पू.
साहित्य.. अर्धा वाटी कोरफडीचा गर. नसेल तर 1चमचा कोरफड जेल घेणे. 1/2चमचे कोणताही सौम्य शाम्पू.
कृती..कोरफडीचा जेल व शाम्पू 1वाटी पाण्यात मिसळून 1तास ठेवणे कोरफडीचा गर केसांच्या मुळापासून टोकांपर्यंत लावून अर्धा तास ठेवणे वरील मिश्रणाने शाम्पू करणे. कोरफड केसांसाठी खूप उपयुक्त आहे केसांना कंडिशनर करते. यामुळे केसांना चमक येते केस मऊ होतात.
By using this homemade Aloe Vera shampoo you can make hair silky & shiny.
Buy natural Aloe-Vera shampoo online
अंड्याचा शाम्पू
साहित्य-1 ग्लास गरम पाणी. 2अंडी. हे साहित्य केसांच्या लांबी नुसार कमी जास्त करू शकता.
कृती- पाण्यात अंडे फेटून घेणं. हे मिश्रण गाळून घेऊन सर्व केसांना व्यवस्तीत लावणे. 1तासाने केस स्वछ धुऊन घेणे. अंड्या मुळे केसांना छान चमक येते.
Buy Natural egg shampoo for hairfall.
कडुनिबांचा शाम्पू
साहित्य -2वाटी कडुनिबांच्या पानाची पूड. अर्धा किलो शिकेकाई पूड. अर्धा किलो बेसनपीठ. 125ग्रॅम चंदन पावडर.
कृती-वरील सर्व साहित्य एकत्र करून हवा बंद डब्यात ठेवा. केस धुताना 1वाटी पाण्यात 2चमचे पूड मिक्स करून शाम्पू सारखे वापरणे. कडुनिबांमुळं कोंडा कमी होतो.
शिकेकाई शाम्पू..
साहित्य – अर्धा किलो शिकेकाई पूड 125ग्रॅम मेथीच्या पानाची पूड. 5/6लिंबू च्या सालाची वाळवून केलेली पूड.
कृती – वरील सर्व साहित्य एका हवाबंद डब्यात भरून ठेवणे. केस धुताना पाण्यात मिक्स करून वापरणे.
Home made conditioner in Marathi.

मेहंदी कंडिशनर – Prevent whitening of hair.

साहित्य -1कप मेहंदी पावडर. 2कप दही. 1टीस्पून ऑलिव्ह ऑइल.
कृती– वरील सर्व साहित्य मिक्स करून मिश्रण केसांच्या मुळापासून टोकापर्यंत लावणे. 1तासभर ठेऊन केस धुऊन घेणे. हे आपल्याला केस पांढरे होण्यास प्रतिबंधित करण्यात मदत करेल.
Buy natural Henna Conditioner.
Brandy कंडिशनर – Make hair smooth & Silky
साहित्य -1चमचा ब्रँडी व 1अंडे.
कृती– अंडे फेटून घ्या त्यात ब्रँडी घालून व्यवस्थित मिक्स करणे पूर्ण केसांना व्यवस्थित लाऊन 10/15मिनिटाने धुऊन घेणे.हे केस मुलायम बनविण्यात मदत करते .
मधाचे कंडिशनर – Make hair Silky and shiny

साहित्य -साहित्य- 1 चमचा मध, 1 अंडे आणि 2 चमचे ऑलिव्ह तेल.
कृती– एक अंडे छानसा फेटून घ्या., नंतर मध आणि ऑलिव्ह तेल घाला आणि चांगले मिक्स करा. हे मिश्रण मुळापासून टोकापर्यंत केसांना लावा. 15 मिनिटांनंतर केस धुवा.यामुळे केस मुलायम चमकदार होतात.
Buy natural Honey conditioner.
Instant conditioner – Make hair silky & Thick.
साहित्य -2चमचे एरंडेल तेल. 1अंडे 1टीस्पून ग्लिसरीन. 1टीस्पून व्हिनेगर.
कृती– हे सर्व साहित्य एकत्र करून व्यवस्थित फेटून घ्या. हे मिश्रण मुळापासून केसांना लाऊन थोडावेळ मसाज करा. केसांना स्टीम द्या नसेल तर गरम पाण्यात टॉवेल बुडूवून पिळून केसांवर गुंडाळून ठेवा. थोड्या वेळाने केस स्वच्छ धुऊन घ्या. हे कंडिशनर केस मुलायमआणि दाट करेल.
You May Also Like – Ramoji Film city guide & Best Photos.
3 thoughts on “How to Make hair silky & smooth. Natural homemade tips in Marathi.”