September 23, 2023

लसुन व मिरची यांची माहिती व त्याचे औषधी उपयोग.

लसुन व मिरची यांची माहिती व त्याचे औषधी उपयोग.(Chili & Garlic information in Marathi) स्वयंपाक घरात लसणीची फोडणी देताना जो घमघमाट सुटतो.त्याने भुकेलेल्या माणसाची भूक  खवळून उठते. पदार्थाची रंगत, चव वाढवणारी लसुन नित्य परिचयाचे आहे. औषधासाठी ही लसणाचा उपयोग होतो. लसुन पांढरा व लाल रंगांमध्ये आढळते.लसूण व लसणीचे तेल दोन्हींचा फायदाच होतो. So lets see Lasun v Mirchi yanchi mahiti ani aushadhi upyog.

लसुन व मिरची यांची माहिती व त्याचे औषधी उपयोग.
लसुन व मिरची यांची माहिती व त्याचे औषधी उपयोग.

लसूण चे औषधी उपयोग – Garlic & Its health benefits in Marathi.

लसूण चे औषधी उपयोग - Garlic & Its health benefits in Marathi.
लसूण चे औषधी उपयोग – Garlic & Its health benefits in Marathi.

A— लसणाच्या पाकळ्या चमचाभर तुपामध्ये तळून जेवणापूर्वी खाल्यास आमवात बरा होतो.

.B– लसूण वाटून त्या लगदा मध्ये हळद व गूळ घालून मुक्कामार बसलेल्या जागी त्याचा लेप लावल्यास फायदा होतो.

C— जखमेचा व्रणला कीड लागली असेल तर लसुन व मिरी वाटून त्यांचा जखमेवर लेप द्यावा.

D– लसूण बारीक वाटून कानशिलावर बांधल्यास अर्धशिशीवर उतार पडतो. त्याचप्रमाणे लसणाचा रस नाकात घातल्याने अर्धशिशीवर फायदा मिळतो.

E– लसणीचा रस सतत तीन दिवस नियमित पणे चोळल्याने उष्णतेमुळे शरीरावर पसरलेले चट्टे बरे होतात.

F– जिरे,धने, मिरे, पुदिना,सैंधव व लसूण बारीक वाटून घ्यावेत. ही चटणी खाल्ल्याने वाढलेला रक्तदाब आटोक्‍यात येतो.

G– लसणाच्या पाकळ्या थोड्या चेचून तेलात घालाव्यात व तेल कडकडीत गरम करावे. तेल कोमट झाल्यावर त्याचे थेंब कानात घातल्याने कान दुखणे, कान पिकणे यावर गुण येतो.

H– लहान मुलांचा डांग्या खोकला बरा होण्यासाठी लसणाच्या पाकळ्या वाटून त्याची पुरचुंडी करून त्याचा वारंवार वास द्यावा.

I– लसणाच्या पाकळ्या बारीक वाटाव्यात व त्याचा लगदा एका कापडाच्या पट्टीवर पसरावा तळपायांना तेल लावून ती पट्टी तळपायांना बांधावी सकाळ-संध्याकाळ अशा पट्ट्या लावल्याने फायदा होतो.

J– लसूण वाटून तिळाच्या तेलात घालून खाल्ल्याने पोट फुगणे, वायू विकार, आदी विकार बरे होतात.

K– लसूण, खडीसाखर व सैंधव समप्रमाणात घ्यावी. हे मिश्रण चांगले वाटून.त्यात गाईचे दुप्पट तूप घालून केलेले चाटण घेतल्याने अजीर्ण, पोटात दुखणे, मंदाग्नी,खोकला, संधिवात यामध्ये फायदा होतो.

L– अरुची व अपचन झाले असता लसुन, मनुका, सैंधव, साखर व कोथिंबीरीची चटणी करून खावी.

M– लसूण उष्ण, तिखट,तीक्ष्ण, पौष्टिक, वीर्यवर्धक, स्निग्ध, गरम व पाचक असते.

N– हाडास दुखापत झाली असता लसणाचे सेवन करावे.

O– वायुमुळे पोटात दुखत असल्यास लसूण वाटून तुपात कालवून खावी व त्यावर गरम पाणी प्यावे फायदा होतो.

P– चेहऱ्यावर तजेला येण्यासाठी लसणीचे सेवन करावे. दररोज लसणाचे सेवन केले असता मलावरोध दूर होतो व शौचालाहि साफ होते.

Q– शरीरात चमक,उसन भरल्यास किंवा कळा मारत असल्यास लसणीच्या रसामध्ये हिंग घालून दुखर्‍या भागावर चोळलं असता गुण येतो.

R– उचकी लागली असता लसुन खाल्ल्याने थांबते.लहान मुलांना नेहमी लसुन दिल्याने पोटातील जंत कमी होतात.

S– लसूण ठेचून कापसात गुंडाळून दाढेखाली ठेवल्यास दाढ दुखी बंद होते. So he hote Lasun che Fayde.(Garlic benefits in Marathi)

महत्त्वाची माहिती – Important information about Garlic in Marathi.

लसणीचे अतिरेकी सेवन जठर व आतडे यामध्ये दाह निर्माण करते. काही जणांच्या मते लसुन व दूध हे विरुद्ध आहार असल्याने.त्याचे सेवन फायदेशीर ठरत नाही.लसून उष्ण असल्याने उन्हाळ्यात उष्ण प्रकृती असलेल्यांनी, पित्ताचा त्रास असणाऱ्यांनी त्याचे सेवन जपूनच करावे.अतिसार, रक्तपित्त, उलटी होणे आदींनी तसेच नाजूक प्रकृती असल्याने लसणीची सेवन करू नये.

Also Read – गूळ खाण्याचे फायदे – Jaggery benefits & information in Marathi.

मिरची चे औषधी उपयोग – Chili health benefits in Marathi.

मिरची चे औषधी उपयोग - Chili health benefits in Marathi.
मिरची चे औषधी उपयोग – Chili health benefits in Marathi.

पदार्थांना तिखट चव प्राप्त करून देण्याचे काम मिरची करते. हिरव्या व सुक्‍या मिरच्या आपल्याला सहज उपलब्ध होतात. भाजी,आमटीमध्ये आपण मिरची चा वापर करतो.त्याशिवाय चटणी,रायते,भजी,लोणचे यामध्ये मिरच्या वापरतात. मिरची दळून त्याची मसाला चटणी ही स्वयंपाकात वापरता येते. (मिरची औषधी उपयोग. Health benefits of Chili in Marathi)

A– मिरच्या तिखट, उष्ण,पाचक, पित्तकारक, रक्तवर्धक, कृमिनाशक, कफनाशक असतात. सुक्या मिरच्या वायुनाशक असतात.

B– कॉलरा झाला असता.कापूर, हिंग व मिरच्या समप्रमाणात घेऊन कुटाव्यात व त्याच्या हरभरा एवढ्या गोळ्या कराव्यात.दर तासाने दोन गोळ्या घेतल्यास अतिशय फायदा होतो.

C– मिरच्यांचे बी गरम पाण्यातून घेतल्याने. सर्दीने उत्पन्न होणारा पोटाचा त्रास कमी होतो.

D– सुक्या मिरच्या वापरून त्याचा काढा जेथे ढेकुन झाले असतील तेथे टाकल्याने ढेकणांचा त्रास कमी होतो.

E– विंचवाचा दंश झाला असेल तेथे लवंगी मिरची वाटून लेप लावावा.

F– कोथिंबीर, थोडासा पुदिना,खोबरे, मीठ व मिरची ची चटणी करून खाल्ल्यास अरुची दूर होते.

G– पोटदुखी, हागवन,आमंशाचा त्रास झाल्यावर मिरची पूड मध्ये दुप्पट गुळ घालून गोळी तयार करावी व कोमट पाण्याबरोबर खावी.

H– शरीराच्या कोणत्याही भागावर आलेली सूज घालवण्यासाठी राईच्या तेलात लाल मिरची गरम करून तेल गाळून ते सुजेवर लावावे.

I– कुत्रे चावले असता लाल मिरची वाटून जखमेत भरावी.

महत्त्वाची माहिती – Important information about Chili in Marathi.

मिरच्यांचे अतिरेकी सेवन शरीराला अत्यंत हानीकारक असते. उष्ण प्रकृतीच्या, पित्तप्रकृती असलेल्या लोकांनी ज्यांना वायु प्रकोप झाला असेल. दाह प्रमेह,लघवीची जळजळ यांचा त्रास असेल, त्यांनी मिरचीचे अतिरेकी सेवन टाळावे. यामुळे रक्तातील उष्णतेचे प्रमाण वाढने,त्वचारोग, नेत्ररोग, जठर शिथिल होणे आदि त्रास होतो. So he hote mirchi che fayde ani Aushadhi Upyog

Must Read – साखर आणि खडीसाखर खाण्याचे फायदे – Sugar eating benefits in Marathi.

Comments are most welcome and appreciated.