November 28, 2023

13 Wheat benefits in Marathi – गहू खाण्याचे फायदे

गहू व त्याबद्दल थोडीशी माहिती.

Wheat benefits in Marathi – गहू खाण्याचे फायदे – गहू हा आपल्या आहारातील अत्यावश्यक घटक आहे. आपल्या रोजच्या आहारामध्ये गव्हाच्या पोळ्या असतातच. गहू अत्यंत पौष्टिक धान्य आहे. भारतात गव्हाचे पीक सर्वत्र येते.दीड ते दोन फूट लांबीच्या गव्हाच्या रोपांच्या हिरव्या लोंब्या भाजून केलेला चविष्ट हुरडा अत्यंत छान लागतो. गव्हाचे दाणे वजनदार,हलके,हलके लाल, पांढरा असे प्रकार पडतात. लाल गहू अत्यंत समृद्ध व पौष्टिक घटकांचा अंतर्भाव असलेला असतो.

Also Read – Bajri, Tandul & Makka grains information in Marathi

Wheat benefits in Marathi - गहू खाण्याचे फायदे
Wheat benefits in Marathi – गहू खाण्याचे फायदे

Also Read – फायबर युक्त पदार्थ मराठी माहिती – fiber in food information in Marathi.

13 Wheat benefits in Marathi – गहू खाण्याचे 13 फायदे

 1. गव्हापासून बरेच पदार्थ केले जातात. त्यातच गव्हाचा सांजा तर एकदम बारीक रवा पाडून शिरा केला जातो गुळ घालून केलेला सांजा तर एकदम पौष्टिक तसेच गव्हाचे मालपुवा, धिरडी, पुरणपोळी, लाडू, बिस्किटे, केक, पाव,पुरी रोटी, नान असे बरेच पदार्थ करता येतात.तसेच आपण गव्हाच्या साध्या पोळ्या म्हणजेच चपाती पण रोज करतो
 2. आहारात रोज गव्हाचे पदार्थ खाल्ले तरी चालते. मात्र नवा गहू पचावयास जड व कफकारक करत असतो. वसंत ऋतु गहू खावा पण पण तो पचण्यास जड असल्याने पावसाळ्यात जपून खावा.
 3. गहू गोड पचावयास जड थंड वायु पित्तनाशक कफकारक बलदायी वीर्यवर्धक पुष्टी कारक रुचकर स्निग्ध आहे.
 4. गव्हाची कोवळी रोपे सुद्धा पोष्टिक असतात.या रोपांचा रस पित्तशामक वायुनाशक रक्तवर्धक बलवर्धक शुक्रधातू वर्धक असतो.पित्त विकार,रक्तविकार, आतड्यातील व्रण, शुक्रक्षय,रक्तक्षय,मूत्रावरोध, उष्णता, आम्लपित्त, दाह, जीर्ण ज्वर यामध्ये गव्हाचा रोपांचा रस रोज सेवन केल्यास फायदेशीर ठरतो.
 5. प्रमेहा चा त्रास झाला असता 100 ग्रॅम गहू दीड ग्लास पाण्यात भिजत घालावेत सकाळी बारीक वाटून त्यात दोन चमचे साखर घालून आठवडाभर घेतल्याने प्रमेह दूर होतो. गळू झाल्यास त्यावर गव्हाचे पोट्याश बांधल्यास गळू पिकून फुटतो.
 6. पांडू रोग तसेच कफ विकारांमध्ये गव्हाचे सत्व द्यावे.
 7. नाकाचा घोळणा फुटल्यास गव्हाच्या पिठात साखर व दूध घालून घेतल्याने वाहणारे रक्त थांबते.
 8. लठ्ठ माणसांनी आहारात गव्हाची चपाती तेल व तूप न लावता खावी गव्हामध्ये चरबीचा अंश कमी असतो.
 9. गव्हाच्या पिठात दूध तूप किंचित मीठ घालून ते पीठ चांगले मळून घ्यावे व त्याचे पोळ्या करून रोजच्या जेवणातून घ्यावे दमा खोकला वीर्य दुर्बलता अशक्तता यावर ते फायदेशीर ठरते.
 10. शरीरास बल व पुष्टी येण्यासाठी गव्हाचे पीठ दुधात कालवून त्यात मध खडीसाखर साजूक तूप घालून शिजवावे व रोज सकाळी खावे.
 11. गहू टिकवून ठेवण्यासाठी त्यात कडूनिंब किंवा मेथीची सुकलेली पाने घालावीत.
 12. गहू पचण्यास जड असतो त्यामुळे ज्यांची पचनशक्ती कमजोर आहे अशांनी याचे सेवन जपूनच करावे.
 13. तापाचा जोर वाढल्यास जुलाब मुरडा होत असल्यास अग्निमांड्या चा विकार असल्यास पोटात गुबारा धरल्यास म्हणजेच गॅस झाला असेल तर गव्हाचे सेवन टाळावे. कफ संग्रहणी,उदररोग, या विकाराने त्रस्त असणाऱ्यांनी तसेच बाळं तिनेही गव्हाचे सेवन टाळावे.

Must Read – ज्वारी खाण्याचे फायदे व पदार्थ in Marathi Jwari che fayde ani padarth.

tags – Benefits of eating wheat in Marathi, wheat benefits, wheat information in Marathi,