September 23, 2023

10 superfoods to improve immunity of children in Marathi.

मुलांची रोगप्रतिकार शक्ती कशी वाढवावी.

Tips improve immunity of children in Marathi – मुलांच्या वाढत्या विकासासाठी त्यांना हरतऱ्हेच्या पोषक घटकांची गरज असते. तुम्हाला तुमचं मूल शारीरिक आणि मानसिक दृष्ट्याही स्वस्त हवा असेल तर मुलांच्या आहारामध्ये रोगप्रतिकारक शक्ति वाढविणाऱ्या या दहा पदार्थांचा अवश्य समावेश करा.

10 superfoods to improve immunity of children.
10 superfoods to improve immunity of children.

मुलांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आहार – 10 superfoods to improve immunity of children in Marathi.

1- दूध – Dudh pinyache fayde.

हाडे मजबूत बनविण्यासाठी दूध पिणे अतिशय जरुरी आहे. दुधामध्ये कॅल्शिअम,फॉस्फरस, प्रथिने,कार्बोहायड्रेट यासारखी पोषक तत्व असतात.जी शरीरास अतिशय गुणकारी असतात. मुलांना दूध प्यायला आवडत नसल्यास तुम्ही त्यांना वेगवेगळे मिल्कशेक बनवून देऊ शकता. मुलांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी दूध हा आहार खूप उपयुक्त ठरतो.

Milk benefits for child immunity in Marathi
Milk benefits for child immunity in Marathi

2- दही – Dahi khanyache fayde.

भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि प्रथिने असलेले दही मुलांचे दात आणि हाडे मजबूत बनवण्यास मदत करते. दही पचनासाठी मदत करते. ताज्या फळांसोबत मुलांना दही खायला द्या.

3- अंडे – Andi khanyache lahan mulana fayde.

मुलांच्या दररोजच्या आहारामध्ये 45 ते 55 ग्रॅम प्रथिने असलीच पाहिजेत, असे डॉक्टर सांगतात. रोज एक अंडे खाल्ल्यास त्यातून मुलांना भरपूर प्रथिने मिळतात. त्यामुळे त्यांच्या मेंदूचा विकास होतो. या व्यतिरिक्त अंड्यामध्ये अधिक प्रमाणात आवश्यक विटामिन्स आणि मिनरल्स असतात अंड्यामध्ये कोलिन नावाचं पोषक तत्त्व अधिक प्रमाणात असतं जे मुलांच्या बुद्धिमत्तेच्या विकासासाठी गरजेचं असतं अंड उकडून वा फ्राय करून देता येतं. त्यामुळे मुलांना अंडी खायला घाला आणि त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवा

eggs benefits for child immunity boosting in Marathi
eggs benefits for child immunity boosting in Marathi

4- पालक – Palak khanyache rog pratikarak shaktivar fayde.

पालक भाजी लोह, कॅल्शियम,फॉलिक सिड जीवनसत्त्व यांचे उत्तम स्त्रोत आहे. मुलांच्या मानसिक विकासासाठी आणि हाडांच्या बळकटीसाठी पालक खाणं गरजेचं आहे. पालक लगेच शिजतो पालकच सूप बनवून किंवा फ्रांकी मध्ये घालून मुलांना देता येतो.

5- तुळस – Tulsi che mulansathi fayde.

तुळस ही औषधी वनस्पती आहे.हे आपल्याला माहीत आहे,त्यात अँटिऑक्सिडंट जीवनसत्व अ, ब आणि लोह,पोटॅशियम आणि कॅल्शियम देखील असतं. ज्यामुळे मुलांची पचनशक्ती व्यवस्थित होते.तुळशीमुळे डोकेदुखी थांबते.हे संशोधनाने सिद्ध झालं आहे.तुम्ही कधी जर पास्ता बनवला तर थोडी तुळशीची पानं वाटून सॉस मध्ये घाला. तुळशीचे पण जरी रोज एक खायला दिले तर लहान मुलांमधील रोग प्रतिकार शक्ती वाढते

6- बेरी – Berries khanyache immuinity varil fayde.

ब्लूबेरी,स्ट्रॉबेरी आणि रासबेरी या सगळ्यात पोट्याशियम, क जीवनसत्त्व, फायबर,कार्बोहायड्रेट आणि अँटिऑक्सिडंट असतात. यात फॅट आणि कोलेस्‍ट्रॉल असत नाही.या सर्वच बेरीज गोड असतात.त्यामुळे मुलांनाही आवडतात या बेरीज तुम्ही ओट्स,दही वा दलिया मध्ये मिक्स करून मुलांना देऊ शकता.

Eat berries boost immunity in Marathi
Eat berries boost child immunity in Marathi

7-ओट्स – Benefits of Oats for child (Marathi).

अनेक संशोधनानंतर असं सिद्ध झालं आहे की, ओट्स खाणारी मुले एकाग्रतेने अभ्यास करू शकतात, तसेच शाळेतही त्यांचा परफॉर्मन्स चांगला असतो.फायबरचं अधिक प्रमाण असलेलेओट्स सावकाश पचत आणि मुलांना उर्जा देतो.

8- बटाटा- Batatyache lahan mulansathi fayde.

फायबर,कॅल्शियम आणि अ जीवनसत्वन भरलेले बटाटे मुलांना खायला द्या ते जर ओव्हनमध्ये फ्राय केले तर त्याचा स्वाद मुलांना अधिक आवडेल.जर तुम्ही शाकाहारी असाल तर अंड्याचे अल्टरनेटीव्ह म्हणून बटाटा योग्य ठरेल त्यामुळे प्रथिने मुलांमध्ये वाढतात व त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढते

9- होलग्रेन ब्रेड – ब्रेड खाण्याचे लहान मुलांना फायदे

मुलांच्या टिफिन मध्ये ब्रेड, खेळून आल्यानंतर नाश्त्यामध्ये ब्रेड, झटपट आणि आरामात बनणाऱ्या पदार्थांमध्ये ब्रेडचे पदार्थ हे पालक आणि मुलं दोघांच्या पसंतीचं होत चाललं आहे. त्यामुळे मुलांना पौष्टिक आहार देण्याबरोबरच, त्यांना ऊर्जा मिळावी यासाठी व्हाईट ब्रेड ऐवजी होले ग्रेन किंवा व्हीट ब्रेड ज्यात लोह,झिंक, फॉलिक सिड, कॅल्शियम आणि अ व ड जीवनसत्व जास्त मिळतं ते खायला द्या.आज-काल मुलांचं वजन सहज वाढत. परंतु एनर्जी च्या बाबतीत ही मुलं कमी पडतात, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे.अशात मग होल व्हीट ब्रेड बराच गुणकारी ठरतो.

10- पीनट बटर – Pinute butter benefits for child Immunity in Marathi.

साधारण बटरचा तुलनेत पीनट बटर अतिशय न्यूट्रिशियस असतो. यात लोह,प्रथिने,फायबर आणि ब जीवनसत्त्वाचे प्रमाण अधिक असतं. दोन टेबलस्पून पीनट बटर मध्ये अठ्ठावीस प्रति शेकडा प्रथिनांचे प्रमाण असतं.तर साधारण बटर ऐवजी पीनट बटर ब्रेड ला लावून दिल्यास लहान मुलांमधील रोग प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी फायदा होतो

मुलांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आहार
मुलांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आहार

मुलांना सकस अन्नाची ओळख कशी करून घ्यायची? How to feed child Nutrition reach food Marathi Tips?

बहुतांशी मुलं ही आपल्या पालकांच्या सवयीचा अनुकरण करत असतात.त्यामुळे काय करायचे, खायचे,प्यायचे काय काय,बोलणे योग्य आहे का?याकडे पालकांनी ही लक्ष द्यायला हवं.विशेषतः जेव्हा मुलं तुमच्यासमोर असतील.

मुलं जेवताना नखरे करत असतील,तर त्यांना लवकर जेवण संपवन्याकरता बक्षीस द्या.परंतु बक्षीस म्हणून जंकफूड आणून देण्याचे कबूल करु नका. टेस्टी डीप सॉसेसही मुले पसंत करतात,ते तुम्ही भाज्यांसोबत सर्व करू शकता.

कोणताही नवीन पदार्थ खाऊन पाहण्यासाठी मुलांवर दबाव आणू नका.त्यामुळे ते जिद्दी होऊ शकतात.त्यांना एक बाईट खाण्यास सांगा..म्हणजे ते स्वतः आपली आवड नावड समजू शकतील.

सकस आहार घेण्यासाठी मुलांना शरीराने स्ट्रॉंग असणाऱ्या व्यक्तींची उदाहरणे द्या. म्हणजे मुलं त्यांच्यापासून प्रेरित होऊन सकस आहार घेतील. मुलांना सतत काही ना काही खायला हवं असतं, त्यांच्यासाठी हेल्दी स्नॅक्स बनवून ठेवा.

मुलांनाच नाही तर पालकांनाही हेल्दी अन्न खाण्याची सवय असली पाहिजे. लंच डिनर च ठरवत असाल तर मुलांचाही सल्ला घ्या.तसेच भाज्यांची निवड करण्याची संधी त्यांना देऊन बघा.

मुलं फळं खात नसतील तर फळांपासून बनवलेले शेक आणि स्मुदिजही देता येतील. पॅकेट मधील बंद राहिलेले अन्न मुलांना देऊ नका,त्यापेक्षा घरीच बनवलेलं अन्न द्या.

कुटुंबातील सर्वांसोबत बसून जेवण्यास मुलांना शिकवा. कधीकधी मुलांना त्यांच्या आवडीनुसार जंकफूड ही खायला द्या,म्हणजे त्यांना कोणत्याही गोष्टीबद्दल लालसा निर्माण होणार नाही.तळलेल्या पदार्थांच्या ऐवजी बेक्ड केलेले पदार्थ मुलांना खायला द्या. हिरव्या भाज्यांचं सूप करून द्या.

Comments are most welcome and appreciated.