November 28, 2023

Bhendichya biyanchi amti recipe in Marathi

भेंडीच्या बीयांची आमटी Recipe

Bhendichya biyanchi aamti recipe in Marathi
Bhendichya biyanchi aamti recipe in Marathi

बऱ्याच वेळा बाजारातून आणलेल्या भेंडीत निब्बार म्हणजेच जुनं भेंडी निघते. त्यात खूप मोठ्या बिया असतात त्यामुळे ति टाकली जाते. पण तीन टाकता त्या बिया काढून त्यांची आमटी करायची.

Also read – नाचणीचे पराठे – Nachniche/Ragi Parathe Easy recipe

भेंडीच्या बीयांची आमटी बनवण्याचे साहित्य

भेंडीच्या बिया 1 वाटी,10/12 पाकळ्या लसूण,पाव वाटी सुके किंवा ओले खोबरे,4/5हिरव्या मिरच्या(तिखट पणा चवीनुसार), थोडी कोथिंबीर, जिरे 1चमचा,मीठ चवीनुसार, तेल फोडणी पुरता, चिमूटभर साखर, हळद, हिंग, कडीपत्ता.

भेंडीच्या बीयांची आमटी Recipe
भेंडीच्या बीयांची आमटी Recipe

भेंडीचा बीयांची आमटी बावण्याची कृती

प्रथम भांड्यात एक छोटा चमचा तेल घालून भेंडीच्या बिया व्यवस्थित भाजून घेणे.

खोबरे, हिरव्या मिरच्या, लसूण, जिरे हे सर्व साहित्य मिक्सर मध्ये बारीक वाटून घेणे.

भांड्यात फोडणीसाठी तेल घालणे. त्यात जिरे, मोहरी, कडीपत्ता व बारीक केलेलं वाटण घालून छानसा भाजून घेणे. मिश्रण भाजत आले कि त्यात हळद,हिंग व भाजून घेतलेल्या भेंडीच्या बिया घालणे. सर्व व्यवस्थित भाजत आले कि आपल्याला हवं तेवढा पाणी घालून चवीनुसार मीठ घालणे. चिमूटभर साखर ghalavi. एक छानशी उकळी येऊ द्या वरून कोथिंबीर घाला व सर्व करा.

एक टीप – यात आपण पाणी न घालता ताक ही घालू शकता.

bhendicha biyanchi amti, bhendichya danyachi amti, bhendichi amti,.

You may like – 9 Vegetarian food Benefits & 6 Disadvantages.

2 thoughts on “Bhendichya biyanchi amti recipe in Marathi

Comments are most welcome and appreciated.