September 23, 2023

How to maintain your beauty tips in Marathi?

सौंदर्याची स्वच्छता कशी राखावी? How to maintain your beauty tips in Marathi?

सौंदर्याची आकांक्षा कोणाला नाही? परंतु सौंदर्य नुसतीच इच्छा असून मिळत नाही. त्यासाठी मेहनत करणे आवश्यक आहे.सौंदर्यासाठी ते करा. हे वापरा, हे खा…अस आपण नेहमीच वाचत आलो आहोत. आज आपण सौंदर्यासाठी आवश्यक अशी एक महत्त्वाची बाब जाणून घेऊया. ती बाब आहे स्वच्छता. स्वच्छता ही सौंदर्याची पहिली अट आहे.आता तुम्ही विचार कराल की सुंदर दिसण्या मध्ये स्वच्छता कुठून आली. तर त्वचा असो, केस असो,किंवा डोळे यांच्या स्वच्छतेची काळजी घेतली नाही तर यांचं सौंदर्य अबाधित राहणार नाही. So lets start beauty Hygiene tips in Marathi.

सौंदर्याची स्वच्छता नाही राखली तर.. What if you don’t take care of your beauty? Marathi.

जर सौंदर्याच्या स्वच्छतेची काळजी घेतली गेली नाही तर कधी डोळ्याची समस्या, कधी त्वचेचा संसर्ग, खाज येणे, कधी केस गळणे किंवा नखे अथवा ओठांची समस्या उद्भवू शकते. एवढेच नाही तर यामुळे आपल्याला आजार व इतर कोणत्याही प्रकारचा संक्रमण होऊ शकते.शरीर आजारी पडल्यावर सौंदर्य निरोगी कसे राहील. सौंदर्याची सतत स्वच्छता म्हणजेच (ब्युटी हायजीन) काय आणि ते कसे टिकवायचे ते जाणून घेऊ या.सौंदर्याचे स्वच्छता म्हणजे आपली त्वचा,केस,डोळे नसते. सौंदर्याशी संबंधित कोणताही भाग स्वच्छ आणि संसर्ग मुक्त ठेवणे तसेच सौंदर्य उत्पादने आणि मेकअप साधने स्वच्छ ठेवने.

Did you know about these PERSONAL HYGIENE tips for your FULL BODY?

you may like – 13 best winter skin care tips in Marathi – हिवाळ्यात त्वचेची घ्यावयाची काळजी .

सौंदर्याची स्वच्छता कशी राखावी? (How to keep your beauty Clean tips in Marathi.)

A– आपल्या त्वचेच्या थेट संपर्कात येणारी कोणतीही गोष्ट स्वच्छ आणि निर्जंतुक करा.आपल्या हातांनी चेहर्‍याला पुन्हा पुन्हा स्पर्श करू नका.

B– आपले हात साबणाने नियमितपणे स्वच्छ करत रहा.

C– फेस नॅपकिन चा पुन्हा पुन्हा वापर टाळा. ते स्वच्छ धुऊन मगच त्यांचा वापर करणे चांगले होईल.

D– मुरुमांना पुन्हा पुन्हा स्पर्श करू नका आणि त्यांना नखं लावून फोडू नका.

E– आपली नखं स्वच्छ ठेवा. त्यांच्यामध्ये बरेच जंतू वाढू शकतात. शक्यतो नखे वाढू दिली नाही तर चांगले होईल. लांब नखांमध्ये घाण साचते.त्यामुळे संसर्गाचा धोका जास्त राहतो. तुम्हाला नखे लांब ठेवायचे असतील तर ती पूर्णपणे स्वच्छ ठेवा.

F– केसांमध्ये जास्तवेळा स्टायलिंग उत्पादने वापरणे टाळा. केसांमध्ये घाम असल्यास ते कोरडे करा आणि त्यांना सैलस र बांधून ठेवा.

G– घामामुळे केसांना दुर्गंधी येते शिवाय स्काल्प मध्ये इन्फेक्शन आणि डोक्यातील कोंडा यासारख्या समस्या निर्माण होतात.

H– केसांच्या आरोग्यासाठी टाळू निरोगी आणि आरोग्यदायी असणे खूप महत्त्वाचे आहे.

I– टाळू मध्ये खाज सुटण्याची समस्या असल्यास त्यावर उपचार करणे आवश्यक आहे.

How to maintain your beauty tips in Marathi?
How to maintain your beauty tips in Marathi?

Also Read – पावसाळ्यात केसांची निगा कशी राखावी? Monsoon hair care tips in Marathi.

मेकअप करताना काय करावे आणि काय करू नये. (Do’s & Dont’s about makeup tips in Marathi.)

A– तुमची मेकअप करण्याची प्रसाधने कोणासोबतही शेअर करणे टाळा.

B– नेहमी ब्रशने लिपस्टिक लावा बहुतेक लोक लिपस्टिक थेट बोटाने किंवा थेट ओठांवर लावतात त्यामुळे जीवाणूंच्या वाढीचा धोका जास्त असतो.

C– लीप ब्रश पासून मेकप ची सर्व साधने नियमितपणे स्वच्छ आणि निर्जंतुक करा.

D– त्वचेची नियमित काळजी घ्या स्वच्छता, टोनिंग आणि मोश्चरायझिंग करा.

E– काजळा पासून आयलायनर पर्यंतचं कोणतच प्रसाधन दुसऱ्याशी शेअर करू नका.

F– तुमचा कंगवा स्वच्छ ठेवा आपला कंगवा सुद्धा शेअर करू नका.

G– खाजगी भागांची स्वच्छता ठेवा आणि नको-असलेले-केस नियमित स्वच्छ करा.

H– त्वचा आणि मेकअप उत्पादनांची एक्सपायरी डेट तपासत राहा.

I– सर्व उत्पादनांच्या सेल्फ लाइफ ची जाणीव ठेवा.

J– त्वचेची छिद्रे स्वच्छ ठेवावी. जेणेकरून घाम,तेल आणि घाण यांच्यामध्ये जमा होणार नाही. नाहीतर मुरमे होऊ शकतील.

K– कच्चे दूध घेऊन त्यात थोडे मीठ घालून त्वचा स्वच्छ करा.त्यामुळे त्वचेची छिद्र देखील साफ होतील आणि एक प्रकारे स्क्रबिंग देखील होईल.

L– कोमट पाण्याने चेहरा धुऊन झाल्यावर.चेहरा पुन्हा थंड पाण्याने धुवावा जेणेकरून त्वचेवरील छिद्र बंद होतील.

M– नियमितपणे एक्सफोलियट करा. त्याने मृत त्वचा आणि मृत पेशी निघून जाऊन त्वचा स्वच्छ आणि निरोगी राहील.

N– पायाच्या स्वच्छतेची देखील काळजी घ्या.पायांना घामाचा वास येणं त्रासदायक आहे. घामामुळे जंतूची भरभराट होते.आपल्या चपला आणि मोजे स्वच्छ ठेवा. अन्यथा पायांच्या त्वचेचा संसर्ग होऊ शकतो.

O– आंघोळ करताना पायांना चांगले घासून घ्या आणि नंतर मोश्चरईझ करा.

P– त्याचप्रमाणे शरीराच्या अंतर्गत भागांच्या स्वच्छतेची काळजी घ्या. अंडरआर्म स्वच्छ ठेवा.

Q– जर जास्त घाम येतो नाही काही समस्या असेल तर त्यावर योग्य उपचार करून घ्या.

R– खूप घट्ट असलेले कपडे घालू नका.अशा कपड्यांमध्ये त्वचा श्वास घेऊ शकत नाही आणि संसर्गाचा धोका राहतो.

S— सुती पेंट घाला जी तेथील नाजूक त्वचेची विशेष काळजी घेऊ शकेल.

T– बिकिनी क्षेत्र आणि अंडर आमच शेविंग करत असाल तर शेविंग नंतर मॉइश्चरायझर करा.

U– वॅक्सिंग करत असाल तर वॅक्सिंग झाल्यावर अस्ट्रिजंट आठवणीने लावा आणि मॉइश्चरायझर करा.

सौंदर्याशी संबंधित या सर्व छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला नेहमी सुंदर ठेवतील आणि तुमचं सौंदर्य व आरोग्य देखील निरोगी आणि स्वच्छ राहील.

tags – सौंदर्य कसे टिकवावे, स्वच्छ व सुंदर कसे राहावे, benefits of clean beauty, Maintaining your beauty clean, beauty tips in Marathi, Cleaning of beauty, Beauty hygiene tips in Marathi.

Also Read – कोरड्या त्वचेवरील उपाय (Dry skin care tips in Marathi)

Comments are most welcome and appreciated.