December 3, 2023

Drumsticks information & Moringa recipe in Marathi.

शेवग्याच्या शेंगा आहारात व आरोग्यासाठीही महत्त्वाची भूमिका बजावतात. शेवग्याची बी त्रिकोणी व पांढरट असते. ते पांढरे मिरे म्हणूनही ओळखले जाते. शेंगाची शेवग्याच्या पाल्याची तसेच फुलांची भाजी केली जाते. पंचतारांकित हॉटेल्समध्ये शेवग्याच्या शेंगाचे सुप ड्रमस्तिक सूप म्हणून मिळते. तसेच या शेंगा घातलेले पिठले ही रुचकर लागते.

Drumsticks information & Moringa recipe in Marathi.

शेंगा घालून कढीही बनविली जाते. शेवग्याच्या जातीमधील गोड शेवगा औषधासाठी तर कडू शेवगा वात विकार व बाह्य विकारांवर उपयोगी पडतो. शेवग्याच्या झाडावर येणारा डिंक कपडे छापण्यासाठी तयार होणाऱ्या रंगात वापरला जातो. शेवग्याच्या बिया मधून निघणारे तेल सुगंधी तेल बनवण्यासाठी तसेच घड्याळे साफ करण्यासाठी वापरतात शेवग्याचा पाला हाडांना बळकट बनवतो. हाडाच्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहे . तसेच शेवग्याचा पाला हा रक्तवाढीसाठी खूप चांगला आहे.

Drumsticks information & Moringa recipe in Marathi.
Drumsticks information & Moringa recipe in Marathi.

Also Read – मध खाण्याचे फायदे – benefits of eating honey in Marathi.

Drumsticks benefits in Marathi – शेवगा खाण्याचे फायदे.

Shevga Khanyache Fayde.

A– शेवगा गरम,हलका,मधुर,तिखट अग्नि प्रदीपक,रुचकर,दाहकारक,वीर्यवर्धक, पित्त व रक्त प्रकोपक असून,शेवग्याची भाजी वातवीहारक आहे.

B– शेवग्याच्या मुळ्यांचा रस काढून किंवा त्यांच्या काढ्यात मध घालून घेतल्याने गळू बरे होतात.

C– शेवग्याच्या काढ्यात मध घालून दिवसातून दोन तीनदा थोडेथोडे घेतल्यास पोटातील बारीक कृमी नष्ट होतात.

D–या काढ्यात सोडा घालून पिल्याने मुतखडा विरघळतो.

E– शेवग्याच्या मुळाची साल पाण्यात किंवा गोमूत्रात उगाळून नायट्यावर लेप लावल्यास नायटा बरा होतो.

F– चित्र कमळ, शेवग्याच्या मुळाची हिरवी साल व कोंबड्यांची विष्ठा वाटून त्याचा लेप नारू वर दिला असता नारू बरा होतो.

G– दाताच्या पोकळीत शेवग्याचा डिंक भरल्याने दातदुखी बरी होते.

H– शेवग्याच्या मुळांच्या रसात तेल, सैंधव व मध घालून त्याचे थेंब कानात टाकल्याने कान दुखायचे थांबते. शेवग्याचा डिंक तेलात घालून त्याचे थेंब कानात टाकल्याने ही कान दुखायचे थांबते.

You may like – गूळ खाण्याचे फायदे – Jaggery benefits & information in Marathi.

Drumstick Leaves – Moringa recipe in Marathi – शेवग्याच्या पानाची भाजी.

साहित्य–शेवग्याची पाने 3 वाटी

I– शेवग्याच्या सालीचा काढा मध्ये चित्र कमळ, पिंपळी यांचे चूर्ण घालून व त्यात सैंधव टाकून पाजल्याने जलोदर नाहीसा होतो.

H– शेवग्याच्या सालीचा काढा प्यायल्याने व त्याच्या सालीचे पोटीस बांधल्याने साकळलेले रक्त मोकळे होऊन प्रवाही बनते.गळवे बरी होतात. शेवग्याची साल गळवांवर चोळल्याने गळवे चिरून जातात.

I— शेवग्याच्या पानांच्या रसात चमचाभर साखर घेऊन तीन दिवस प्यायल्याने वायूने आलेला गोळा नाहीसा होतो.

J-– शेवग्याच्या पानांच्या रसाने डोके चोळल्यास डोक्यातील कोंडा निघून जातो.

K— मस्तकशूळ झाल्यास शेवग्याच्या पानांच्या रसात मिरे वाटून त्याचा लेप करावा.

L– पोट फुगले असता शेवग्याच्या पानांच्या रसाचा काढा तयार करून त्यात हिंग व सुंठ घालून द्यावा.

M– शेवग्याच्या पानांच्या रसाचा काढा करून त्यात मिरे, सैंधव व पिंपळीचे चूर्ण घालून प्यायल्याने प्लीहोदर बरा होतो.

N-– शेवग्याच्या काढ्यात सुंठ व हिंग घालून प्यायल्याने वायूचा प्रकोप होऊन शरीरात कोठेही दुखत असल्यास थांबते .

O-– शेवग्याच्या पानांचा काढा भरपूर प्रमाणात करून एका मोठ्या भांड्यामध्ये ओतून त्यात मुळव्याध ग्रस्त रुग्णाला बसवल्यास त्याच्या वेदना दूर होतात.

P-– शेवग्याच्या पानांच्या रसात मध घालून डोळ्यात घातल्याने डोळे दुखायचे बंद होते.

Q-– शेवग्याचा डिंक दुधात वाटावा मस्तक पीडा होत असल्यास शेवग्याच्या डिंकाचा मस्तकावर लेप द्यावा.

R-– मिरपूड व शेवग्याचे बी बारीक कुटून एकत्र करून हुंगल्यास शिंका येऊन डोकेदुखी दूर होते.

S– शेवग्याच्या पानांचा रस पाजल्याने उचकी थांबते व धाप लागणे कमी होते.

T– त्वचा विकारा मध्ये अंघोळीच्या वेळी पाण्यात शेवग्याचा पाला उकळून त्या पाण्याने स्नान करावे.

U– शेवग्याचा पाला अधून-मधून चावल्याने दात किडत नाहीत तसेच दात आणि हिरड्या मजबूत होतात.

V– बाळंतीनिने शेवग्याच्या भाजीचा वापर आहारात केल्यास गर्भाची वाढ चांगली होते.प्रसूती सुलभ रीत्या होते. तसेच अंगावर भरपूर दूध येते.

W– शेवग्याच्या बियांची पूड पाण्यामध्ये टाकल्यास पाणी स्वच्छ व निर्जंतुक होते.

X– शेवग्याच्या शेंगांची भाजी खाल्ल्याने भूक लागते. तोंडाला चव येते.तसेच पोट दुखी ही बरी होते.

Y– कंबर दुखत असेल तर शेवग्याच्या झाडाची साल बारीक ठेचून सोसवेल इतपत गरम करून कमरेवर बांधावी.

Must read – Milk dairy products information in Marathi – Benefits, Uses & demerits.

शेवग्याच्या पानांची भाजी.

साहित्य–शेवग्याची पाने 3 वाटी,एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून, खोबरे खिस पाव वाटी. बेसनपीठ जरा जाडसर दळलेल, गोडेतेल, मोहरी, हळद, मेथी 5/7दाणे, तिखट, मीठ, हिंग, गूळ.

कृती —शेवग्याची पाने स्वच्छ धुन चाळणीत निथलुन घ्यावीत. भांड्यात तेल घालून त्यात मोहरी, मेथी दाणे, हळद, हिंग, कांदा घालून छानसा भाजून घ्यावं. त्यात पाने घालून परतून घ्या. त्यात तिखट, मीठ, गूळ घालून एक 4/5 मिनिट भाजी वाफवून घेऊन बेसन टाकून. परत वाफ देऊन खोबरे खिस घालून परतून घ्यावी.

टीप – यात तिखटऐवजी हिरवी मिरची घालू शकतो.

Also read – Bajri, Tandul & Makka grains information in Marathi

tags – Moringa recipe in Marathi, Shevgyachya pananchi Bhaji, Shevghyache fayde, Drumsticks recipe in Marathi, Drumsticks benefits in Marathi

One thought on “Drumsticks information & Moringa recipe in Marathi.

Comments are most welcome and appreciated.