Table of Contents
How to take care of dense & soft hair? Marathi Tips.

घनदाट मुलायम केसांची स्वच्छता कशी राखावी.
शाम्पू ने केसांची स्वच्छता केली जाते.त्यामुळे शाम्पू ची निवड आणि शाम्पू वापरण्याची योग्य पद्धत महत्त्वपूर्ण ठरते.
तेलकट कोरड्या व सामान्य केसांसाठी शाम्पू च्या बाटलीवर चिकटवलेल्या लेबलमध्ये सविस्तर माहिती दिलेली असते. परंतु केसांमध्ये कोंडा असेल तर anti-dandruff व मेडिकल शाम्पू बाजारात उपलब्ध आहेत. शाम्पू वापरणार यांनी शाम्पू पीएच किंवा ॲसिड संतुलन माहिती करून घेणे जरुरीचे आहे कसं पाहता सगळे शाम्पू हे ऍसिड संतुलित तच असतात. परंतु एखाद्या शाम्पूचा पी एच फॅक्टर त्याची ऍसिड व अल्कलाइन डिग्री दर्शवतो. जर पी एच फॅक्टर 5 ते 8.5डिग्रीच्या दरम्यान असेल तर त्याच ऍसिडिक संतुलन जास्त असते. आणि 8.5 किंवा 11 डिग्रीहुन अधिक पीएच संतुलन असणाऱ्या शाम्पू मध्ये अल्कलाइन खूप अधिक असते.असा शाम्पू सामान्य व कोणत्याही प्रकारच्या रंग व डाय केलेल्या केसांना कमी हानी पोहोचवितो.कारण का शाम्पू अशा केसांच्या स्वच्छतेसाठी सर्वस्वी उत्तम मानला जातो. सोबतच डोक्याची त्वचा निरोगी राहण्यासाठी उपयुक्त ठरतो.कोंडा होण्याचा व खाज येण्याचा त्रास होत नाही.
आवश्यकतेनुसार जास्त फेस येणारा शाम्पू चांगला आहे असं मानू नये. याउलट फेस न येणारा शाम्पू उत्तम स्वच्छता करतो. ज्या ठिकाणी पाणी खारं असतं तिथेही शाम्पूचा फेस कमी येतो. परंतु याचा अर्थ शाम्पू खराब आहे असा नव्हे.
शाम्पू च्या वापराची पद्धत व कालावधी या बाबी सुद्धा तितक्याच महत्त्वाच्या असतात.शाम्पूचा वापर करण्यापूर्वी केसातील गुंता सोडवून घ्यावा कारण गुंता झालेले केस धुताना अधिकच गुंततात. शाम्पू करतेवेळी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जर केस लहान असतील तर डोकं पुढील बाजूस झुकवून केस धुवावेत. आणि केस लांबसडक असतील तर सरळ उभे राहून डोकं व मानेला पाठीच्या बाजूने वाकून केस धुणं अधिक योग्य ठरतं.
शाम्पू आणि कंडिशनर चा योग्य वापर विशेषतः स्त्रियांसाठी
केस धुणं आणि त्यांची योग्य निगा राखणे हे वाटतं तितकं सोपं नाही.कारण महिलांचे केस हे पुरुषांच्या तुलनेत लांब असतात.
- केस धुण्यापूर्वी ते व्यवस्थित करून घ्यावेत. जेणेकरून केस धुताना गुंता होऊन तुटणार नाहीत.
- त्यानंतर एका बादलीत केस धुण्यासाठी कोमट पाणी घ्यावे कधीही खूप गरम पाण्याने केस धुऊ नयेत.
- आपल्याला जेवढा शाम्पू लागतो तेवढा एका मग मध्ये घेऊन पाण्यामध्ये मिसळून घ्यावा शाम्पू केसांवर डायरेक्ट लावू नये.
- केसांना शाम्पू लावल्यानंतर पोटाच्या अग्र भागाने डोक्याला हलक्या हाताने मालिश करावं.लक्षात ठेवा बोटांच्या अग्र भागाचा वापर करावा नखं लावू नयेत.
- केस धुऊन शाम्पू व्यवस्थित स्वच्छ धून काढावा. केसात राहिलेला थोडासुद्धा शाम्पू केसांना हानी पोहोचवू शकतो.
- आता केसांवर कंडीशनर लावा.यासाठी केस दोन भागात विभाजित करा.मग कंडिशनर हातावर घेऊन केसांवर लावावे. कंडीशनर केसांच्या मुळापर्यंत पोहोचता कामा नये डोक्याच्या स्किन ला लावू नये फक्त केसांना लावावे. नाहीतर केस कमकुवत होतात
- केसांना कंडिशनर लावून एक मिनिट तसेच ठेवावे आणि मग केस धुताना कंडिशनर व्यवस्थित स्वच्छ धुऊन घ्यावे.
- शेवटी थंड पाण्याने केस धुऊन घ्यावेत त्यामुळे केसांचे क्युटिकल बंद होतील आणि ते चमकदार बनतील.
- केस लहान असोत वा मोठे आठवड्यातून कमीत कमी तीन वेळा स्वच्छ धुवावेत. नेहमी सौम्य आणि विश्वासार्ह ब्रँडच्या शाम्पू ची निवड करा तसं पाहता रिठा शिकेकाई आवळा हेसुद्धा उत्तम पर्याय आहेत
- आठवड्यातून एक ते दोन वेळा केसांना कोमट तेलाने मालिश जरूर करावं घरातून बाहेर जाताना केस कपड्याने झाकावेत ऊन आणि धूळ यांचा थेट संपर्क केसांना येणार नाही याची काळजी घ्यावी.केस घामाने चिकट होत आहेत असं जाणवेल तेव्हा केस धुवा आणि केस धुणं शक्य नसेल तर घामाने ओले झालेले केस कोरडे करावेत