Table of Contents
05 Raksha Bandhan coconut recipes in Marathi, Rakhi & Narali Pornima food Recipes in Marathi.

राखी पौर्णिमा व नारळी पोर्णिमे साठी नारळाचे काही छान असे पदार्थ.
1- नारळी भात – Rakshabandhan special recipes in Marathi
साहित्य– जुना आंबेमोहोर किंवा बासमती तांदूळ दोन वाटी.गूळ चिरून तीन वाट्या.लवंग तीन किंवा चार. वेलची पूड.नारळाचे खोबरे दोन वाट्या बारीक किसून साजूक तूप तीन चमचे.उकळते पाणी 4 वाट्या.चवीनुसार मीठ.
कृती– तांदूळ स्वच्छ धुऊन पंधरा ते वीस मिनिट तसेच भिजत ठेवावे व नंतर निथळून घ्यावे पातेल्यात दोन चमचे तूप घालून लवंग व तांदूळ परतवून घ्यावी. त्यात उकळलेले पाणी व चवीपुरते मीठ घालून भात मोकळा शिजवून घ्यावा.नंतर तो ताटात घेऊन पूर्ण मोकळा करून घ्या.
नारळाचा खीस व गुळ एकत्र मिसळावा त्यात वेलची पूड घालून घ्यावी. एक जाड जाड बुडाच्या भांड्यात एक ते दोन चमचा तुपावर भात नारळ गुळ सर्व घालून एकत्र करावे मंद गॅस वर ठेवून हळूहळू ढवळत दोन ते तीन वाफा येऊ द्या.
Also Read – नाचणीचे पराठे – Nachniche/Ragi Parathe Easy recipe
2- नारळाची बर्फी – Rakhi Pornima special Recipes
साहित्य — खोबऱ्याचा कीस दोन वाट्या.दूध एक वाटी. साखर अडीच वाटी.वेलची पूड. पिठीसाखर व तूप लावलेला ताट किंवा ट्रे.
कृती– खोबर्याचा किस दूध व साखर मिक्सर वर एकदा फिरवून गॅसवर मंद आचेवर ढवळत राहावे व त्याचा गोळा होऊन पातेल्यात करू लागला की मिश्रण तूप लावलेल्या ताटात थापावे व कोमट असताना वड्या कापाव्यात. यात आपण ड्रायफ्रूट्स व खावा आवडीनुसार घालू शकतो.
3- नारळाच्या दुधातील शेवया – Recipes for Narali Pornima
साहित्य– तांदूळ पीठ, नारळाचे दूध, गुळ, वेलची पावडर.
कृती– मोदकाप्रमाणे उकड करून कोमट झाल्यावर व्यवस्थित मळून घ्यावी त्याचे गोळे करून उकळत्या पाण्यात सोडावे. उकडून शिजले की गोळे वर येतात. पाण्यावर तरंगतात ते बाहेर काढून घ्यावेत कोमट झाले की सेवेच्या जाड बाटलीने डिशमध्ये गोल गोल कुरडाई सारखं घालून घ्यावी. नारळाच्या मध्यम दाट दूधात चिरलेला गूळ विरघळवून वेलची पूड घालावी चवीला खूप छान लागतात.
4- सांजणी recipe – Rakshabandhan Marathi recipes
साहित्य– तांदळाचा रवा दोन वाट्या. नारळाचे दूध दोन वाट्या. साखर एक वाटी. केशर जायफळ आणि वेलची पूड मीठ काजू काप.
कृती– तांदळाचा रवा कोरडा भाजून नारळाच्या दुधात अर्धा तास भिजत ठेवावा. मग साखर मीठ वेलची व जायफळ पूड घालून ढवळावे. तुपाचा हात लावलेल्या ताटात घालून वरून काजू बदाम काप घालून ढोकळ्या प्रमाणे वाफवून घ्यावे व चौकोनी वड्या कापाव्यात.
5- रवा नारळाचे लाडू – Marathi Rakshabandhan foods
साहित्य — दोन कप बारीक रवा. एक कप ताजा नारळाचा चव. दिड कप साखर.एक कप पानी. तीन ते चार चमचे तूप.अर्धा चमचा वेलची पावडर. थोडेसे बेदाणे.
कृती— रवा मध्यम आचेवर 56 मिनिट कोरडाच भाजावा.मंद आचेवर भाजावा करपवू नये. रंग बदलू पर्यंत भाजू नये अगदी हलकेच भाजावे. कारण नंतर परवा भाजायचा आहे.भाजलेला रवा परातीत काढावा. त्यात खवलेला नारळ घालावा व मिसळून घ्या नारळातील ओलसरपणा रव्यात उतरू पर्यंत दहा मिनिटे तसाच ठेवावा.कढई गरम करून त्यात तूप घालावे.तूप वितळले कि नारळ व रवा चे मिश्रण घालावे.
आठ ते दहा मिनिट हे मिश्रण हाय मिडीयम फ्लेमवर भाजावे. सतत ढवळत रहावे तळाला लागू देऊ नये.काही वेळाने रवा आणि तुपाचा छान वास येतो.रव्याचा रंग हलका बदामी होईपर्यंत भाजावा भाजलेले मिश्रण परातीत काढून ठेवावे.साखर आणि पाणी एकत्र करून एक तारी पाक करावा.पाक तयार झाला कि गॅस बंद करावा लगेच पाक रवा नारळाच्या मिश्रणात ओतावा मिक्स.करावे मिश्रण सुरूवातीला पातळ दिसेल पण काही वेळाने घट्ट होईल. यात वेलचीपूड घालावी मिश्रण आळू पर्यंत मध्ये मध्ये मिक्स करत राहावे. मिश्रण आळले कि लाडू बनवावेत प्रत्येक लाडवावर एकेक बेदाणा लावावा.
3 thoughts on “5 Tasty & Easy Raksha Bandhan coconut recipes in Marathi”