September 23, 2023

आंबा – MANGO information & benefits in Marathi

आंबा – MANGO information in Marathi

सर्व फळांचा राजा ‘आंबा’ गोड,मधूर व परिपक्व आंबा  खाल्ल्यावर मन तृप्त होतं.So lets discuss MANGO information in Marathi, भारतामध्ये आंब्याचे उत्पादन जास्त प्रमाणात होते. गुजरात मधील केशर, बलसाडी तर महाराष्ट्रात हापूस, पायरी, तोतापुरी आणि उत्तर भारतात बनारसी, किशनभोग, लंगडा तर दक्षिण भारतातील केसरिया, शिवप्‍पा ह्या आंब्याच्या काही जाती अतिशय प्रसिद्ध आहेत. काहीजण आंब्याच्या फोडी कापून खातात तर काहीजण आंबे चोखून खातात. तर काहीजण आमरस प्रिय असतात. आंब्यापासून स्वादिष्ट पेय आम्रस, आंबापोळी, कैरीचे लोणचे, गुळांबा, साखर आंबा,आंब्याची चटणी, आंबा बर्फी, इत्यादी.. चविष्ट प्रकार बनवले जातात. आता आंब्याचे गुणधर्म काही औषधी माहिती घेऊ.  So lets see Mango information in Marathi, Mango in Marathi, Amba khanyache Fayde & Amba falachi Mahiti.

आंबा - MANGO information in Marathi
आंबा – MANGO information in Marathi

Also Read – Drumsticks information & Moringa recipe in Marathi.

आंबा – MANGO Benefits in Marathi

A– आंब्याचे मूळ रूप कैरी कैरी पिकल्यावर आंबा तयार होतो. कैरीचा प्रामुख्याने उपयोग लोणचे,मुरंबा यामध्ये होतो. कैरीचे पन्हे ही बनवले जाते. लहान कच्ची कैरी आंबट,तुरट वायूकारक,पित्तकारक असते. मोठी कच्ची कैरी त्रिदोष कारक असते, कच्चा कैरी पासून बनवलेला मुरांबा चविष्ट  व पौष्टिक असतो. तसेच तोंडाला रुची आणतो व पित्त ही नाहीसे करतो.परंतु कच्चा कैरी मुळे मंदाग्नी, मलावरोध, रक्ताचे व पोटाचे विकार होऊ शकतात.

B– पिकलेल्या गोड आंब्यामध्ये ए व सी जीवनसत्व असते. जंतुनाशक व त्वचा रोग हारक असाही त्याचा उपयोग होऊ शकतो. पिकलेला आंबा पचायला थोडा जड,थंड, पित्तकारक व थोडासा कफवर्धक असतो . शरीरात रस धातू निर्माण करणारा आंबा अस्थी,मेद,मज्जा, शुक्र या धातूंची वृद्धी करतो. पचनसंस्थेचे रोग, फुफ्फुसाचे रोग,आमाशयाचे रोग,रक्‍ताची कमतरता यावर आंब्याचा औषध म्हणून उपयोग होतो.

C– पिकलेला आंबा बलवर्धक, पोट स्वच्छ ठेवणारा, चरबी वाढवणारा असून,, मृदू रेचकही असल्याने शौचास साफ होते. आम रसाच्या सेवनाने अरुची, आम्लपित्त,आतड्यांचे रोग,यकृता संबंधीच्या विकारांमध्ये ही फायदा होतो.

D– आंब्याच्या सेवन केल्याने मेदाचे प्रमाण वाढते. तसेच दुधाबरोबर  सेवन केल्याने वीर्यवृद्धी होते.

E–आंब्याच्या कोई मधून निघालेले तेल संधिवातावर उपयोगी ठरते.

F– दुर्बल व कमजोर प्रकृती असलेल्यांनी प्रथम गाईचे दूध पिऊन त्यावर रसदार गोड आंबा चोखून खावा. अशाप्रकारे दीड दोन महिने दररोज दूध व आंब्याचे सेवन केले असता पचनक्रिया सुधारून भूक लागते. मलावरोध दूर होतो वीर्य दौर्बल्य व रक्‍तदोष दूर होतो.

G– आंब्याची कोय दह्यात वाटून दिल्याने आमतीसार दूर होतो. तसेच ताकात वाटून दिल्याने रक्तातीसार दूर होतो. So these were Amba khanyache fayde.

You may Like – Bajri, Tandul & Makka grains information in Marathi

कैरीचे लोणचे – Mango Pickle recipe in Marathi

कैरीचे लोणचे - Mango Pickle recipe in Marathi
कैरीचे लोणचे – Mango Pickle recipe in Marathi

साहित्य — एक किलो कैरीच्या फोडी, एक वाटी मोहरी डाळ, दीड वाटी मीठ,अर्धा वाटी लाल तिखट, पाव वाटी हळद, चार चमचे हिंग,दोन चमचे मेथ्या,अर्धा किलो तेल.

कृती — थोड्याशा तेलात हिंग व मेथी चा तळून पूड करावी. तेलात मोहरी व हळद घालून फोडणी करावी. फोडणी गार झाल्यावर ती फोडणी व मीठ कैरीच्या फोडींना चोळावे. उरलेले मीठ,लाल तिखट, हिंग पूड, हळद, मेथी पूड, मोहरी डाळ सर्व एकत्र करून त्यात कैरीच्या फोडी घालाव्यात. उरलेली फोडणी ओतून लोणचे कालवून बरणीत भरावे. तेल लोणच्याच्या वर न आल्यास, आणखी तेल गरम करून गार करावे व फोडींच्या वर तेल येईल तेवढे टाकावे. So this is popular & Tasty Amba/Kairy loncha chi recipe you must try.

Also Read – 13 Wheat benefits in Marathi – गहू खाण्याचे फायदे

साखर आंबा – Sweet Mango pickle recipe in Marathi.

साखर आंबा - Sweet Mango pickle recipe in Marathi.
साखर आंबा – Sweet Mango pickle recipe in Marathi.

साहित्य — एक किलो आंब्याचा किस, दोन किलो साखर, लवंगा विलायची पूड.

कृती– आंब्याचा किस कसा करायचा.तर आंबे धुवून कोरडे करावेत.स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचे. साल काढून आंबे स्टील किसणीवर किसावेत. साखर आंब्याला पाड लागलेल्या आंब्याचे आंबे घ्यावेत.आंबट असतील तर पिळावेत व आंबट रस काढून टाकावा. हा रस सरबत करण्यासाठी वापरू शकतो. आंबे जास्त आंबट नसतील तर रस काढू नये.कीसाच्या दुप्पट प्रमाणात साखर मिसळावी. गूळ घातला तरी चालतो त्याचा गुळांबा होतो. आंब्याचा किस साखर किंवा गूळ एकत्र करून पातेल्यात घ्यावे गॅस वर ठेवून हलवत रहावे साखरेचा पाक आटेपर्यंत हलवावे. थंड झाल्यावर लवंगा व विलायची पूड मिसळून बरणीत भरून ठेवावे. So this is tasty Sakhar Amba recipe you must try.

Must Read – How to maintain your beauty tips in Marathi?

tags – Mango information in Marathi, Mango in Marathi, Amba khanyache Fayde & Amba falachi Mahiti, Ambyachi Mahiti.

Comments are most welcome and appreciated.