hello everyone recently I have visited Raireshwar fort from Pune. It took around 2.5 hours of bike travel to reach Raireshwar fort. The view of fort is mesmerizing & you will definitely enjoy the nature & greenery of Wai in your ride to Raireshwar. So lets be with me till the end for Raireshwar fort information in Marathi.

Table of Contents
Watch our Youtube Video on Raireshwar Fort Vlog in Mansoon.
Raireshwar Fort information & History in Marathi – रायरेश्वर किल्ला माहिती आणि इतिहास
रविवारी आम्ही राजगड ला जायचा प्लॅन केला पण covid restrictions मुळे आमहाला जाता आलं नाही. त्यामुळे आम्ही रायरेश्वर ला जायचा निर्णय घेतला तेथून रायरेश्वर ला जायला आम्हाला १ तास लागले. पण खूप मजा अली कारण आजूबाजूचा सुंदर निसर्ग , मस्त असे रस्ते यावर ride करायला खूप मज्जा आली.
तर पुण्यावरून रायरेश्वर कडे जाताना मध्ये पहिला पॉईंट लागतो तो म्हणजे नेकलेस पॉईंट, तर नदीचा आकार निसर्गाला नेकलेस घातल्यासारखा आहे त्यामुळेच त्या पॉईंट च नाव नेकलेस पॉईंट असा आहे.
भोर तालुक्यातील किल्ले रायरेश्वर कडे जातानाचे रस्ते तुम्ही पाहू शकता. आजूबाजूला मस्त असे डोंगर आणि हिरवीगार झाडी यातून प्रवास करताना खूप मज्जा येते.



नेकलेस पॉईंट नंतर पुढचा पॉईंट लागतो तो म्हणजे झुलता पूल (Jijasaheb Suspension bridge ), त्याखाली तुम्हाला पाण्याचे सुंदर असे झरे पाहायला मिळतील. पुलाचा आजही दळण वळण्यासाठी वापर होतो .



Raireshwar Fort trek – height & difficulty level.
तर जिजासाहेब झुलता पूल झाल्यानंतर आम्ही एक दोन ठिकाणी फोटोग्राफी साठी थांबलो आणि मग थेट रायरेश्वर चा पायथ्याशी थांबलो . रायरेश्वर च्या आधी केंजळगड सुद्धा आहे तर एका दिवसात दोन्ही गाडी करू शकता पण तुम्हाला सकाळी लवकर जावं लागेल. तर रायरेश्वर किल्ल्याची समुद्रसपाटीपासूनची उंची ४५०५ फूट आहे पण गडावरूनच आपण ७०% उंची कव्हर करतो त्यामुळे ट्रेक खूप मोठा नाहीय. किल्ल्यावर पोहोचायला फक्त १ तास लागतो आणि वर फिरण्यासाठी दोन तास. असा एकूण ४ तासाचा हा ट्रेक आहे. ट्रेक सुद्धा सोपा आहे , फॅमिली ट्रिप साठी perfect .
Points to see on Raireshwar Fort
रायरेश्वर वर गेल्यानंतर पाहण्यासाठी १-२ पाण्याच्या टाक्या , फुलांची झाडे , तलाव , भाताची शेती सुद्धा आहे . त्यानंतर रायरेश्वराचं मंदिर , पांडवकालीन लेणी, दुर्गा मंदिर व सात रंगांची माती हि महत्वाचे पॉईंट्स आहेत .
You may like – Rajgad Fort Pune – Information & Awesome Trekking experience






Also Read – Andharban Jungle trek Pune
Raireshwar fort information in Marathi
तर किल्ल्याचा पायथ्याला आम्हाला भूक लागली होती त्यामुळे आम्ही जेवण करून घेतलं. तिथे माकडांनी खूप त्रास दिला त्यामुळे सुखाने खाता आला नाही हा हा ….






थोडा खाऊन झाल्यानंतर आम्ही चढाईला सुरुवात केली. तर ट्रेक एकदम सोपा आहे तुम्ही तुमची फॅमिली इव्हन लहान मुलांनाही नेऊ शकता. अवघड आणि धोकादायक असा काहीच नाहीय.



Best time to visit Raireshwar Fort/Plateau.



तर रायरेश्वर ला जाण्याची योग्य वेळ म्हणाल तर एक तर पावसाळ्यात आणि दुसरा हिवाळ्यामध्ये. आम्ही पावसाळ्यामध्ये गेलो होतो. पावसाळ्यामध्ये तुम्हाला धबधबे, त्यानंतर धुके यांची मजा घेता येईल. पण ऑक्टोबर महिना रायरेश्वर पठारावर जाण्यासाठी सर्वात उत्तम मनाला जातो ह्याचा कारण म्हणजे रायरी पठारावरील सुंदर फुलराई. ऑक्टोबर मध्ये कास पठारासारखं सौंदर्य तुम्हाला रायरेश्वर पठारावर पाहायला भेटेल .
कारण तेव्हा विविध प्रकारची फुले उमललेली असतात त्यामुळे सुंदर नजरे पाहायला मिळतील. तर माझा मते रायरेश्वर किल्ल्याला भेट देण्याची योग्य वेळ हि ऑक्टोबरच आहे. पावसाळ्यात तुम्हाला आजूबाजूचे किल्ले पठारावरून दिसणार नाहीत कारण चोहीकडे धुके असतात.



Image credits – Vaibhav Jadhav – Wai Paryatan
तर रायरेश्वर पठारावर गेल्यानंतर तुम्हाला एक तलाव पाहायला भेटेल. तेथून पुढे गेल्यानंतर एक पाण्याचं टाकं आहे.
Must Read – Bhandara Dongar/hill Pune Photos & Information Amazing Vlog
Raireshwar Temple – स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा – किल्ले रायरेश्वर
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या १६व्या वर्षी – २७ एप्रिल १६४५ रोजी येथेच स्वराज्याची शपथ घेतली होती.वयाच्या १६ व्या वर्षी शिवरायांनी रायरेश्वराच्या मंदिरात बाजी पासलकर, तानाजी मालुसरे, बापूजी मुदगल, नरसप्रभू गुप्ते, सूर्याजी मालुसरे,कान्होजी जेधे, येसाजी कंक, सूर्याजी काकडे,सोनोपंत डबीर या आपल्या १२ सवंगडी यांच्या सोबत २७ एप्रिल १६४५ रोजी स्वराज्याची शपथ घेतली.. तर रायरेश्वर किल्ल्यावर गेल्यानंतर तुम्हाला पहिला प्रमुख ठिकाण म्हणजे रायरेश्वर मंदिर पाहायला भेटेल. रायरेश्वर मंदिरामध्ये सुंदर अशी महादेवाची पिंड आहे ज्याला साक्षी ठेवू शिवरायांनी स्वराज्याची शपथ घेतली होती आणि त्या स्वराज्यासाठी ते आयुष्यभर झटले होते. अशा ह्या स्वराज्य संस्थापक शिवरायांना आमचा मनाचा मुजरा. महादेवाचं दर्शन घेतल्यानंतर तिथेच आई भवानीच मंदिरही आहे त्याचा दर्शन घेतलं.






Raireshwar Pandav Caves



रायरेश्वर मंदिरापासून उजवीकडे गेल्यानंतर पांडव लेणी आहेत आणि डावीकडे गेल्यावर सात रंगांची माती आहे. आम्ही किल्ल्यावर उशिरा गेल्याने वेळ कमी होता त्यामुळे किल्ल्यावर प्रमुख आकर्षण सात रंगांची माती आम्ही पाहायचं ठरवलं.लेणी मोजकीच आहेत त्यामुळे सात रंगांची मातीला प्राधान्य द्या.
Raireshwar – 7 color soil point – रायरेश्वर पठारावरील सात रंगांची माती.
तर आमचा रायरेश्वर चा प्रवासामधील सर्वात मस्त आणि शेवटचा पॉईंट म्हणजे रायरेश्वर पठारावरील सात रंगांची माती ज्याला seven color soil असाही नाव आहे तर तिथे पोहोचणे थोडेसे कठीण आहे पण तेथील लोकांची मदत घेऊन किंवा google map वर seven color soil search करूनही जाऊ शकता.
आम्ही तसच केला google map चा मदतीने आम्ही सात रंगांच्या मातीपर्यंत पुहोचलो आणि आम्ही अवाक झालो कारण खरंच खूप सुंदर दिसत होता तोच विविध रंगांच्या मातीचा पृष्ठभाग. तर आम्ही शोधून शोधून सर्व रंगांची माती एका ठिकाणी गोळा केली तर आम्हाला सात न्हवे जवळपास १० रंगांची माती सापडली. तर तुम्ही हा पॉईंट नक्की miss करू नका .रायरेश्वर सात रंगांची माती नक्की पहा.



Raireshwar fort camping
जर तुम्हाला पठारावर राहण्या खाण्याची सोया हवी असेल तर वैभव जाधव याना संपर्क करा. ते तेथीलच रहिवासी आहेत आणि त्यांचं facebook page हि आहे वाई पर्यटन या नावाने तर तुम्हाला नक्कीच सुंदर माहिती भेटेल आणि घरगुती चुलीवरच जेवणाची मजाही घेता येईल.
वाई पर्यटन आयोजित रायरेश्वर पुष्प पठार सफर … तुमची ट्रिप बुक करण्यासाठी 9373368680 वर काॅल करा. (Vaibhav Jadhav)
गोरगरीबप्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतलेले रायरेश्वराचे मंदिर, सात रंगांची माती, सोनकी, गुलाबी तेरडा आणि अनेक दुर्मिळ रंगबिरंगी रानफुले, पांडवकालीन लेणी, जांभळी बंधारा सफर. पारंपारिक मातीच्या घरात मातीच्या चुलीवर बनवलेलं पिठलं-भाकरी, बटाटा-ढोबळी-पडवळ-वांग्याची मिक्स भाजी, भात, पापड, लोणचं, ताक, दही, चहा, पोहे, उपमा, कांदा भजी मिळेल. राहण्याची सोय उपलब्ध आहे.






Also Read – Pratapgad Fort Information & History in Marathi
रायरेश्वराच्या देवालय शिवराय शेवटी निश्चयाने काय बोलले?
रायरेश्वराच्या देवालयात शिवराय आपल्या सवंगड्याना सोबत घेऊन शेवटी निश्चयाने बोलले की,” हिंदवी स्वराज्याच्या रूपाने हे राज्य व्हावे, असे श्रींच्या मनात आहे . श्रींचे मनोरथ आपण पूर्ण करू या. हे हिंदवी स्वराज्य व्हावे हि श्रींची इच्छा आहे.
जर तुम्हाला आमचा लेख आवडला असेल तर नक्की comment करून सांगा.
Other places you can visit near Wai
स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा, raireshwar fort swarajyachi shapath, रायरेश्वर मंदिर कोठे आहे, रायरेश्वराचे मंदिर कोणत्या किल्ल्यावर आहे, रायरेश्वराच्या देवालय कोठे होते, रायरेश्वराच्या देवालय शिवराय शेवटी निश्चयाने काय बोलले, raireshwar fort information in marathi, swarajyacha shapath sohala, shivrayani swarajyachi shapath kothe ghetali, raireshwar mandir kothe ahe.
5 thoughts on “Raireshwar Fort information & History in Marathi – रायरेश्वर किल्ला”